स्त्रीयांमध्ये थायरॉईड आजार होण्याआधी कोणकोणती लक्षणे दिसून येतात

आपल्या बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आजकाल बऱ्याचश्या स्त्रियांना थायरॉईड कमी होणे, थायरॉईड वाढणे ह्या  आजारांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे थायरॉईड हे नाव आपल्या सतत कानावर येत असेल. आज आपण थायरॉईडबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत

थायरॉईड हि एक ग्रंथी असते. जी आपल्या मानेच्या खालच्या बाजूला असते. जी पुरुषांना आणि स्त्रियांना दोघांना हि असते. चयापचय गती नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करण्याचे काम ह्या ग्रंथी अविरत करत असतात.

थायरॉईड ग्रंथी करत असलेल्या या कामात बिघाड झाल्यास आपल्याला थायरॉईड विकार होण्याची शक्यता असते. जर आपल्या आहारात आयोडीनचा समावेश होत नसेल तर त्यामुळे देखील थायरॉईड विकार होण्याची शक्यता असते.

थायरॉईड विकार हे दोन प्रकारचे असू शकतात. 1) हायपोथायरॉईडीझम (ह्या प्रकारामध्ये थायरॉइड ग्रंथी पुरेश्या प्रमाणात शरीराला आवश्यक हार्मोन्स निर्माण करत नाहीत). २) हायपरथायरॉईडीझम (ह्या प्रकारामध्ये थायरॉईड ग्रंथी थायरॉक्सिन हार्मोन्स जास्त प्रमाणात निर्माण करतात.)

आता आपण स्त्रीयांमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हायपोथायरॉईडीझम ह्या थायरॉईड आजाराची लक्षणे जाणून घेऊयात. ह्या थायरॉईड विकारामध्ये अचानक आणि खूप वजन वाढायला लागत.

शरीरावर सूज येते मुख्यत तोंड सुजल्यासारखे दिसते, हार्मोन्समधील बदलांमुळे चिडचिड होत राहते, जास्त प्रमाणात केस गळू लागतात, अचानक दरदरून घाम येतो, अथवा अचानक थंडी वाजून आल्यासारखे वाटते, मासिक पाळी अनियमित होते, पोट व्यवस्थित साफ होत नाही, स्मरणशक्ती कमी झाल्यासारखे वाटते.

या शिवाय काही स्त्रियांना हायपोथायरॉईडीझम ह्या प्रकारच्या थायरॉईड विकारामध्ये भूक कमी होणे अथवा अजिबात भूक न लागणे अशी लक्षणे दिसून आली आहेत.

वरती दिलेल्या लक्षणांपैकी आपल्याला जर तीन पेक्षा जास्त लक्षणे आपल्यामध्ये दिसत असतील तर आपण वेळीच डॉक्टरांची मदत घ्या. जेणेकरून थायरॉईड विकार लवकर बरा होऊ शकेल.

आपल्याला “स्त्रीयांमध्ये थायरॉईड आजार होण्याआधी कोणकोणती लक्षणे दिसून येतात”  हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page