स्वयंपाकघरात सतत स्वयंपाक केल्याने तेलाच्या डागांमुळे किचन मधील भिंत, टाइल्स घाण आणि चिकट होतात.उडणाऱ्या तेलामुळे फक्त भिंतच घाण होत नाही तर स्विच बोर्ड, एक्झॉस्ट फॅन, डब्यांवर ही ही हळूहळू त्यावर धूळ साचून जाड थर तयार होतो.
आणि या गोष्टी वेळेत साफ केल्या नाहीत तर हा घाणीचा, तेलाचा थर अधिक जाड होतो आणि मग तो काढणे अवघड होऊन बसते. मात्र हे डाग केवळ साबणाने घासले तर पूर्णतः निघत नाहीत. आज आपण जाणून घेणार आहोत या घट्ट डागांवर घरगुती उपाय काय करता येतील.
तेलांच्या डागांची भिंत, टाइल्स , चिमणी साफ करण्यासाठी बेकिंग पावडरचा वापर केला जाऊ शकतो. ते वापरण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घ्या ज्यात मीठ आणि बेकिंग पावडर टाका. थोडावेळ पाणी तसेच राहु द्या आणि मग एक कपड्याच्या सहाय्याने भिंत, टाइल्स पुसून घ्या.
लिंबूचे दोन तुकडे करा आणि डाग असलेल्या पृष्ठभागावर घासून घ्या. यानंतर सोडा पाण्यात कापड बुडवून जागा स्वच्छ करा. लिंबू किती प्रमाणात आवश्यक आहे हे आपल्याला साफ करण्यासाठी आवश्यक असलेल्या पृष्ठभागाच्या आकारावर अवलंबून असेल.
कॉर्नस्टार्च च्या मदतीने कोणताही डाग साफ करता येऊ शकतात. एका भांड्यात कॉर्नस्टार्च आणि पाण्याचे घट्ट द्रावण तयार करा आणि ते तेलाच्या डागावर पसरवा. काही काळ असेच राहू द्या. थोड्या वेळाने पाण्याने स्वच्छ करा. तेलाचे डाग बर्याकच प्रमाणात निघून गेले असतील.
मिठाच्या वापराने आपण सहजपणे हट्टी तेलाच्या डागांपासून मुक्त होऊ शकता. प्रथम तेलाच्या भागावर मीठ शिंपडा आणि थोडावेळ राहू द्या, तेल मीठ शोषून घेतल्यानंतर त्या जागेवर व्हिनेगर किंवा लिंबाचा रस फवारून कापडाने पुसून टाका. डाग निघून जातील.
आपल्याला किचनमधील तेलाचे चिकट डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर कमेंट नक्की करा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.