तांदळामध्ये किडे, अळ्या, पाकोळ्या होण्यापासून रोखण्यासाठी घरगुती उपाय

संपूर्ण भारतातील लोकांना भात खायला आवडत म्हणूनच आपल्यापैकी बरेच जण वर्षभर पुरेल इतके धान्य, तांदूळ, डाळी एकदम खरेदी करून ठेवतात. मात्र वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे, दमट जागी धान्य, तांदूळ साठवल्यामुळे बऱ्याचदा तांदळामध्ये किडे, अळ्या, पाकोळ्या व्हायचा धोका असतो.

बाजारात किडे, अळ्या, पाकोळ्या होण्यापासून रोखण्यासाठी अनेक केमिकल असणाऱ्या पावडर, खडू इंजेक्शन उपलब्ध आहेत मात्र हे केमिकल बऱ्याचदा आपल्या धान्यात मिसळल्यामुळे तांदळाला वास लागण्याचा धोका असतो; शिवाय असा तांदूळ खाल्यामुळे आपल्या आरोग्याला ही हानी पोहचू शकते.

म्हणूनच आज आपण तांदळामध्ये किडे, अळ्या, पाकोळ्या होण्यापासून रोखण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हि माहिती महत्वपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त गृहिणींपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी कमेंटमध्ये जास्तीत जास्त गृहिणींना टॅग करा.

सर्वप्रथम आपण ज्या डब्यात तांदूळ साठवणार आहात तो डबा हवाबंद असणे गरजेच आहे. या शिवाय आपण ज्या ठिकाणी हा डबा ठेवणार आहात ती जागा दमट नसली पाहिजे. आपण ज्या डब्यात तांदूळ साठवणार आहात तो डबा चांगला स्वच्छ धुऊन कपड्याने पुसून कोरडा करा. मग काही वेळ उन्हात ठेवा.

उन्हात डबा ठेवल्यामुळे त्यामधील ओलावा नाहीसा होईल. त्यानंतर थोडेसे खडे मीठ निवडून त्यातील मिठाचे मोठे मोठे खडे घ्या. डब्याच्या तळाशी टाका. नंतर काही मिठाचे खडे सुती कपड्यात बांधून डबा भरताना प्रत्येक थराला ठेवा.

तांदूळ साठवताना मिठाचा वापर केल्याने तांदळात आद्रता निर्माण होत नाही. परिणामी आपले तांदूळ वर्षभर आरामात टिकतात. आपण इतर धान्यासाठी देखील हि पद्धत वापरू शकता.

तांदळाच्या डब्यात किडे, अळ्या, पाकोळ्या होऊ नये यासाठी आपण सावलीत वाळवलेली कडुलिंबाची पाने डब्यात मिसळू शकता. कडूलिंबाच्या पानांचा वापर केल्याने त्यामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे किडे अळ्या होत नाही. तांदळाच्या डब्यात 5-6 न सोललेल्या लसणाच्या पाकळ्या ठेवू शकता. लसणाच्या वासामुळे तांदळाला किडे होणार नाही.

आपल्याला तांदळामध्ये किडे, अळ्या, पाकोळ्या होण्यापासून रोखण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आपण आधीपासून आवळ्याचा ज्यूस पित असाल तर आपल्याला त्यामुळे कोणकोणते फायदे झाले हे हि कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page