टाचांना भेगा पडणे घरगुती उपाय

आपण आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी बऱ्याच गोष्टी करतो; मात्र आपण आपल्या हातापायांची तितकी काळजी घेत नाही. हिवाळ्यात बऱ्याच जणींच्या टाचांना भेगा पडायला लागतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. टाचांना भेगा पडल्यावर आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो.

टाचा कोरड्या पडल्यामुळे टाचांवर भेगा असतात. भेगा घालवण्यासाठी रात्री झोपायच्या अर्धा तास आधी पाय कोमट पाण्याने धुऊन टाचांवर हलक्या हाताने शुद्ध नारळाच्या तेलाने मालिश करा. हा उपाय संथगतीने काम करणारा असला तरी सगळ्यात सोपा आहे.

भेगा पडलेल्या टाचांवर पिकलेल्या केळीची साल घासल्याने देखील पाय मऊ व्हायला मदत मिळते. टाचा मऊ होण्यासाठी आपण टाचांवर रात्री झोपायच्या आधी ग्लिसरीन लावू शकता.

रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवून कोरडे करावेत, व त्यानंतर भेगांना वितळलेले मेन लावावे. मेणामुळे खोल भेगा लवकर भरून येण्यास मदत मिळते.

टाचा मऊ होण्यासाठी रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवून कोरडे करा, त्यानंतर भेगांना वितळलेले मेन लावा. मेणामुळे खोल भेगा लवकर भरून यायला मदत मिळते.

आपल्याला टाचांना भेगा पडणे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page