टाचादुखी थांबवण्यासाठी घरगुती उपाय

उंच टाच असलेले शूज, सँडल घातल्याने बऱ्याचदा टाचांमध्ये वेदना होतात. टाचा दुखायला लागल्यावर चालणे, धावणेही अवघड होऊन बसते. आज आपण असे काही उत्तम घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

टाचादुखी थांबवण्यासाठी आपण ऍपल साईड व्हिनेगरचा वापर करू शकता. एका बादलीत अर्ध्यापर्यंत गरम पाणी घ्या. त्यामध्ये एक कप ऍपल सायडर व्हिनेगर टाका. त्यामध्ये आपले पाय सोडा. 15 मिनीटे राहूद्या. असे केल्याने आपल्याला आराम मिळू शकतो.

टाचादुखी थांबवण्यासाठी एका बादलीत अर्ध्यापर्यंत गरम पाणी घ्या. त्यामध्ये मुठभर खडे मीठ टाका. त्यानंतर पाण्यामध्ये १५ ते २० मिनीटे पाय टाकून बसा. या गरम पाण्यात पाय सोडल्याने पायांना शेक मिळून टाचदुखी कमी होते.

टाच दुखी थांबवण्यासाठी विटेचा एक तुकडा थोडासा गरम करुन त्यावर रुईचे पान बांधून त्याने आपल्या टाचेला शेक द्या. असे केल्याने लवकर आराम मिळेल.

टाच दुखी थांबवण्यासाठी 2 चमचे राईचे तेल थोडेसे गरम करून त्याने हलक्या हाताने आपल्या टाचेची मालिश करा. असे केल्याने टाच दुखी थांबून आपल्याला लवकर आराम मिळेल.

आपल्याला टाचादुखी थांबवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page