आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा टाचांवर असतो. वाढलेल्या वजनामुळे, शरीरातील कॅल्शियम कमतरतेमुळे, उंच टाचा असलेल्या चपला, बूट वापरल्यामुळे, संधिवातामुळे, सतत उभे राहून काम असल्यामुळे टाचदुखी होत असते.
टाचा दुखत असल्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ शकतो. टाच दुखत असल्यावर चालणे हि अवघड होऊन जाते. म्हणूनच आज आपण टाचदुखी वेदनेपासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
टाचदुखीच्या वेदना कमी होण्यासाठी एका टब मध्ये गरम पाणी घ्या त्यामध्ये थोडेसे सैंधव मीठ टाकून त्या पाण्यात पाय ठेवून 15 मिनिटे बसा. गरम पाण्यामुळे रक्ताभिरण प्रक्रिया जलद होऊन टाचदुखी कमी होते.
टाच दुखत असल्यास आपण कोमट दुधामध्ये थोडीशी हळद पावडर मिसळून प्यायले पाहिजे. हळद दुध प्यायल्याने शरीरातील रक्तभिसरणाची प्रक्रिया सुधारते; वेदना कमी होतात.
टाचदुखीच्या वेदना कमी होण्यासाठी आठवड्यातून एकदा रात्री झोपायच्या आधी तिळाच्या तेल लावून हलक्या हाताने टाचांची मालिश करा. तिळ तेलाने मालिश केल्यामुळे पायातील स्नायू मोकळे होतात. ज्यामुळे पायांमधील रक्तप्रवाह सुधारतो.
टाचदुखीच्या वेदना कमी होण्यासाठी तळ पायाच्या खाली चेंडू ठेवून अंदाजे दोन मिनटापर्यंत रोल करा. असे केल्याने टाचा दुखी कमी व्हायला मदत मिळते. टाचदुखीमुळे टाचा सुजल्या असतील तर आपण बर्फाने शेकवू शकता. बर्फाने शेकवल्याने सूज कमी होऊन आराम मिळेल.
आपल्याला टाचदुखी वेदनेपासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. अशीच महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.