छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरासमोर आपल्या सवंगड्याना सोबत घेऊन स्वराज्याची शपथ घेऊन धर्मकार्याला सुरुवात केली होती. हे कार्य अत्यंत कठीण तर आहेच पण शिवाय महाराजांच्या कर्तव्यांची आणि निर्णयक्षमतेची कसोटी घेणारा सुद्धा होता.
शिवाजी महाराज जेंव्हा स्वराज्याचा विस्तार वाढवत होते तो आदिलशाहाचा भूप्रदेश होता. शिवाजी महाराजांच्या बंडाळी ला मोडून काढायचं असेल तर सर्वप्रथम शहाजीला अटक केली पाहिजे.
आदिलशहाने विजापूर हुन फर्मान सोडलं आणि २५ जुलै १९४८, शहाजीराजांना जिंजीच्या इथे अटक झाली. अटकेची जबाबदारी पूर्ण करणारा सरदार होता अफझलखान आणि त्याला साथ दिली बाजी घोरपडे आणि मुस्तफाखान यांनी!
आदिलशाह ने युद्धसोबत राजकारण सुद्धा करण्याचा कट आखला शहाजीराजे यांना अटक करून राजकारणाची पहिली चाल चालला. यानंतर शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी त्यांनी फत्तेखानाला पाठवले.
स्वराज्य आता दुहेरी संकटात सापडलं होतं. काय आणि कसा मार्ग काढावा असा मोठा पेच प्रसंग शिवरायांच्या पुढे पडला. दोन पर्याय होते – लढाई किंवा शरणागती.
शरणागती स्वीकारल्यास आत्तापर्यंत मिळालेलं स्वराज्य आदिलशाहाच्या घश्यात घालून. त्याची चाकरी करावी लागली असती, मग जे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्याचं काय कष्टाने उभं केलेलं स्वराज्य सोडून गुलामी. एवढे करून वडिलांवरचे संकट दूर नाही झालं तर..? आता लढाईकरण्या वाचून पर्याय नव्हता.
फत्तेखानाची फ़ौज स्वराज्यात धडकू लागली. आता शरणागती घेण्याचा पर्याय देखील शिवाजी महाराजांच्या जवळ राहिला नाही. आदिलशाह ने युद्ध छेडलं होतं.
स्वराज्यात येऊ घातलेल्या शत्रूचा सामना करण्यावाचून गत्यंतर नव्हतं महाराजांनी युद्धाची तयारी सुरू केली. या वेळी स्वराज्याचा विस्तार होता पुणे, इंदापूर, सुपे व काही मावळ भाग. आणि भागातले इनमीन तीन किल्ले कोंढाणा, तोरणा आणि राजगड.
स्वराज्य छोटं असल्याने शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला तो म्हणजे आपल्या छोट्या स्वराज्यात शत्रूला प्रवेश करू द्यायचा नाही. या युद्धासाठी शत्रूच्याच भूमीचा उपयोग करायचा आणि राजांनी निवड केली पुरंदर गडाची.
पुरंदर त्यावेळी स्वराज्यात आला नव्हता. पुरंदरच्या भौगोलिक परिस्थिती चा अंदाज घेतला तर पश्चिमेकडील बाजू सोडल्यास इतर बाजू डोंगराळ. त्यामुळे गनिमी कावा करण्याची संधी इथे नक्की मिळेल. या परिस्थितीचा फायदा घेऊन राजांनी पुरंदरात प्रवेश केला. निळकंठराव सरनाईक हे पुरंदर चे किल्लेदार शहाजी राजे आणि निळकंठराव यांची मैत्री होती त्या मैत्री खातर महाराजांच्या एका तुकडीने पुरंदर मध्ये प्रवेश केला पण ताब्यात घेतला नाही.
फत्तेखानाला आदिलशाहाने कोंढाण्याच्या मोहिमेवर पाठवले पण शिवाजी महाराज असे अचानक पुढे आल्यामुळे खानाने आपला मुक्काम बेलसरजवळ केला. शिवाजी महाराजांच्या ताकदीचा अंदाज घ्यावा आणि आपल्या सैन्याचा उत्साह वाढावा म्हणून बाळाजी हैबतरावाला शिरवळचे ठाणे जिंकायला पाठवले.
शत्रूला युद्धभूमीवर हरवण्यापूर्वी मानसिक दृष्टीने देखील हरवता आलं पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी शत्रूला गाफील ठेवण्यासाठी या लढाईत भाग च घेतला नाही. याचा प्रत्यय म्हणजे बाळाजीने हा किल्ला सहज जिंकला. किल्ला सहजपणे हाती आल्यामुळे बाळाजी व त्याचे सैन्य या पहिल्या यशाने आनंदित झाले होते.
बाळाजीच्या यशाने खान ही बेसावध झाला आणि पहिल्या यशाने अगदी हुरळून गेला. फतेखान सावध नाही हे लक्षात येताच महाराजांनी अजिबात वेळ न घालवता गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवबा इंगळे, भिकाजी व भैरोजी चोर यांना लगोलग शिरवळची गढी घ्यायला पाठवले.
पहाटे शत्रू गाफील असताना या सैन्याने हल्ला केला. अशा हल्ल्याची कल्पनाच कोणी केली नव्हती. किल्लेदार बाळाजी देखील गाफील होता त्यांच्या सैन्याने मिळेल त्या हत्यारांनी प्रतिकार करायला सुरुवात केली पण मराठे इरेला पेटले होते. गड ताब्यात आला.
शिरवळची गढी जिंकत असताना स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर यांच्या नेतृत्वाखाली दुसरी तुकडी फतेखानच्या छावणीवर बेलसरकडे पाठवली. फतेखानच्या सैन्याने कडवा प्रतिकार आरंभला. खानाच्या सैन्यापुढे राजांचे सैन्य अगदीच मूठभर होते. स्वराज्याच्या सैन्याचे नुकसान होऊ लागले.
आपल्यावरील संकटाचा विचार करून बाजी जेधे व सैन्य परत पुरंदर च्या दिशेने निघाले. सैन्य गडात आल्यावर गडाचे दरवाजे बंद झाले. शिरवळ आणि बेलसर अशा दोन्ही ठिकाणी होत असलेला शिवाजी महाराजांच्या सैन्याने उडविलेली दाणादाण पाहता संतापलेल्या फतेखानाने पुरंदरावर हल्ला केला.
महाराजांचे सैन्य किल्ल्यात वरच्या दबा धरून होते. फतेखान टप्प्यात आल्यावर ताज्या दमाची एक तुकडी किल्ल्यातून बाहेर पडत मोठा हल्ला खानच्या सैन्यावर केला. गोदाजी जगताप यांच्या तुकडी ने समोर येणाऱ्या खानाच्या सैन्याला कापायला सुरुवात केली. गोदाजी चा पराक्रम पाहता. मुसेखान गोदाजींच्या वर तुटून पडला.
दोघांत मोठं युद्ध झालं गोदाजींनी पराक्रमाची शर्थ केली आणि मुसेखानाच्या छातीत आपला भाला घुसवला. खानही अतिशय पराक्रमी होता. त्याने तो बाहेर काढला व त्याही परिस्थितीत तलवारीने लढू लागला.
पण गोदाजीच्या वाराने मुसेखान खांद्यापासून मध्यभागपर्यंत चिरला जाऊन गतप्राण झाला. मुसेखानाची अवस्था पाहून फतेखानाचे सैन्य घाबरले व पळत सुटले. अत्यंत उत्साहात असणाऱ्या मराठय़ांनी सासवडपर्यंत खानाच्या सैन्याचा पाठलाग केला. यात बाजी पासलकर ठार झाले, पण स्वराज्याची पहिली लढाई पूर्णपणे यशस्वी झाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढाई तर जिंकली परंतु त्यांचे वडील शहाजीराजे अजूनही अटकेत होते. त्यांनी गुजरातचा सुभेदार मुरादबक्ष याच्यामार्फत दिल्लीच्या शहाजहान बादशाहाला मोंगलांचा सरदार होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच वेळी आदिलशाहाने अटकेत टाकलेल्या आपल्या वडिलांची सुटका करावी अशी विनंती केली.
आदिलशाहाचा मुख्य आणि महत्वाचा सरदार मुस्तफाखान वारला त्यामुळे आदिलशाहावर दडपण आले. त्याने १६ मे १६४९ ला राजांची काही अटींवर सुटका केली. राजे युद्धभूमीवर आणि राजनीती दोन्ही ठिकाणी पूर्णपणे यशस्वी झाले.
आदिलशहा याने फर्मान सोडलं आणि जिंजी येथे 25 जुलै1948 रोजी लिहिलंय तारीख बरोबर लिहावी