सुटलेलं पोट कमी करण्यासाठी १० प्रभावी घरगुती उपाय

बदललेल्या जीवनशैलीमुळे आज 10 पैकी 6 जणांचे पोट सुटलेलं आपल्याला दिसतंय. पोट सुटणे पोटाभोवती चरबी जमा होणे यागोष्टीला आपण हलक्यात घेतो आणि मग वाढलेल्या वजनामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोर जाव लागत.

बरेच जण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पावडर खातात मात्र अशा ह्या पावडर खाऊन वजन कमी केल तर पावडर खाणे बंद केल्यावर आपले वजन परत पहिल्यासारख होत. म्हणूनच आज आपण सुटलेलं पोट कमी करण्यासाठी अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या आपण घरच्या घरी करू शकता.

सुटलेलं पोट कमी करण्यासाठी आपल्याला आहारात थोडे बदल करावे लागतील; पहिली गोष्ट आपल्या आपल्या आहारात मिठाचे आणि साखरेचे प्रमाण कमी करा कारण मिठामध्ये सोडियम असत सोडियममुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढत आणि लठ्ठपणा वाढतो.

सकाळी झोपेतून उठल्यावर दात घासल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या. कोमट पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील चयापचय क्रिया चांगल्याप्रकारे काम करते अन्न पचन चांगल्याप्रकारे होते.

दिवसभरातून दोन वेळा दालचिनी पावडर अर्धा चमचापेक्षा कमी प्रमाणात पाण्यात मिसळून प्या. असे केल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत मिळते. सुटलेलं पोट कमी करण्यासाठी आहारात लसून, आले अशा पदार्थांचा समावेश असुद्या.

रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यानं पचनक्रिया दर वाढायला मदत मिळते. पचनक्रिया दर वाढल्याने आपल्या शरीरात अतिरिक चरबी जमा होत नाही.

सुटलेलं पोट कमी करण्यासाठी आहारात नियमितपणे दही, ताक अशा गोष्टींचा समावेश करा. पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या लसणाची एक पाकळी खा.

रात्री झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त चरबी वाढत नाही. त्यामुळे पूर्ण झोप घेण्याचा प्रयत्न करा. योगा केल्याने वजन घटण्यास मदत होते. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे.

शरीरातील मेटाबॉलिजम चांगल राहण्यासाठी रात्री हलका आहार घ्या. रात्री उशिरा जेवन करण्याच्या सवयीमुळे पोटावरील चरबी वाढते. त्यामुळे रात्री झोपण्याच्या २ तासाआधी जेवा.

सुटलेलं पोट कमी करण्यासाठी पहाटे कमीत कमी अर्धा तास पायी चालण्याची सवय लावा यामुळे पोटावर आलेली  चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.

झोपण्याआधी शतपावली कण्यास विसरु नका. यामुळे पोटावर जमा झालेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. आपल्याला सुटलेलं पोट कमी करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page