पुण्यातील या प्राचीन मंदिरात आहे “स्त्री रुपातील गणपती”

गणपती, गणेश, विनायक अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा आपला सर्वांचा अतिशय लाडका बाप्पा आपल्याला माहीत आहे पण आपल्याला विनायकी, विघ्नेश्वरी, गजाननी, गणेशिनी, गजमुखी, गणेश्वरी या अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाणारी देवी माहीत आहे?

याच उत्तर आपल्यापैकी बरेच जण नाही असच म्हणतील. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. एका मंदिराबद्दल ज्या ठिकाणी गणपतीच्या स्त्री रुपाची अर्थात विनायकीची मूर्ती आहे.

पुण्याजवळ असणाऱ्या भुलेश्वराच्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्राचीन शिल्पे कोरलेली आहेत. या मध्येच एक महत्वाचे आहे ‘स्त्री रूपातील गणपतीचे’ या गणपतीला ‘विनायकी’ अस म्हटले जाते.

या ‘विनायकी’ बाबत जी माहिती मिळते त्यामध्ये आपल्याला बघायला मिळत कि प्रत्येक देवतेची शक्ती हि जर मूर्तीरुपात दाखवायची असेल तर ती मूर्ती हि स्त्रीरुपात दाखवतात.

‘विनायकाची’ शक्ती म्हणून ती ‘विनायकी’ तसेच यामध्ये ‘गणेशी’ आणि ‘लंबोदरी’ हि देखील नावे आपल्याला बघायला मिळतात. भुलेश्वर येथे असलेली हि ‘विनायकी’ रूपातील गणपतीची मूर्ती आपल्याला प्रदक्षिणा मार्गावर बघायला मिळते तीन मातृकांच्या शिल्पांमध्ये या वैनायकीचा समावेश केलेला आपल्याला आढळतो.

शिल्पातील मूर्ती हि पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहे. अश्या प्रकारची मूर्ती हि वेरूळच्या कैलास लेणी येथे देखील आहे आणि आंबेजोगाई येथील मंदिराच्या कोनाड्यात साडी नेसलेल्या रुपात आहे. या मूर्तीच्या खाली आपल्याला मूषक सुद्धा बघायला मिळतो.

या विनायकीची फारशी मंदिरं नाहीत पण मंदिरांच्या शिल्पकलेत हिला जागा दिली गेली आहे आणि त्या शिल्पांची पूजाही केली जाते. ओरीसा, मध्य प्रदेश, तामिळनाडू अशा काही राज्यांमध्ये गणपतीचे हे स्त्री रूप बघायला मिळतं. मदुराईच्या मीनाक्षी मंदिरात या रुपाचं शिल्प आहे.

अशी हि विनायकी रूपातील गणेश मूर्ती हि भुलेश्वरला, आंबेजोगाईला गेल्यावर नक्की बघा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट करा आपल्याकडे या विषयावरील अधिक माहिती असल्यास आपण आम्हाला खाली मेल वर संपर्क करू शकता.

Leave a Comment

You cannot copy content of this page