दिवसभर आपण बरीच कष्टाची काम करत असतो. कष्टाची काम करण्यासाठी, शरीर मजबूत असणे आवश्यक आहे. मात्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना थोड काम केल तरी थकवा येतो. हात पाय दुखायला लागतात. परिश्रम करण्यासाठी शरीरामध्ये पुरेशी ताकद असणे गरजेच असत.
आपल्या रोजच्या आहारात पुरेश्या प्रमाणात प्रोटीनयुक्त गोष्टींचा समावेश केल्याने योग्य आहार घेतल्याने आणि नियमित शारीरिक व्यायाम केल्याने आपण आपला स्टॅमिना म्हणजेच शारीरिक ताकद वाढवू शकता.
थोड्या कामानंतर थकवा येण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला सकाळच्या नाश्त्यातून पुरेशे प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम मिळालेलं नाही. प्रथिनांचे ग्लुकोज उर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण आपल्या आहारात मॅग्नेशियम घटक असणाऱ्या गोष्टींचा देखील समावेश असणे गरजेच असत.
मॅग्नेशियम युक्त अन्न खाल्ल्याने आपले शरीर अन्नामधून मिळणाऱ्या शक्तीचा अधिक चांगल्याप्रकारे वापर करू शकेल आणि आपल्याला अशक्तपणा जाणवणार नाही.
आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ताकद मिळण्यासाठी आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियमयुक्त गोष्टींचा समावेश केला पाहिजे. जसे कि ताजी फळे, पालेभाज्यांचे सूप, एक वाटी मोड आलेले कडधान्य, सुकामेवा, दुध, पनीर, सोयाबीन, उकडलेली अंडी या पैकी ज्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांचा समावेश आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये करू शकता.
थोडी मेहनत केल्याने लगेच थकवा येत असेल तर आपण आपल्या रोजच्या आहारात शक्यतो सकाळी 1 ग्लास गायीच्या दुधामध्ये 1 चमचा बदाम अथवा अक्रोडची पावडर मिसळून प्या. आयुर्वेदामध्ये दुधाला संपूर्ण अन्न म्हटलेलं आहे.
नियमित दुध आणि बदाम सेवन केल्याने आपल्याला पुरेशे कॅल्शियम मिळेल आणि शारीरिक कमजोरी कमी होईल. (जर नाश्त्याच्या वेळी दुध घेणार असाल तर त्यासोबत आंबट फळ खाऊ नका)
थोड्या कामानंतर थकवा जाणवण्याचे दुसरे कारण शरीरात पाण्याची कमतरता हे देखील असू शकते. म्हणूनच दररोज 8-10 ग्लास पाणी प्या. आपण स्वताला हायड्रेट ठेवल्याने थकवा आणि अशक्तपणा जाणवणार नाही.
शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी सकाळी आपण फळांचा रस पिऊ शकता, दुपारी संत्र्याचे ज्यूस, नारळाचे पाणी, ताक, सूप घेऊ शकता. शारीरिक ताकद वाढवण्यासाठी रात्री झोपण्याआधी अर्धा चमचा अश्वगंधा पावडर कपभर दुधासोबत घ्या.
थोड्या कामानंतर थकवा जाणवण्याचे तिसरे कारण पुरेशी झोप न घेणे. आपल्या शरीराला पुरेसा आराम न दिल्याने देखील आपल्याला थकवा जाणवू शकतो. त्यामुळे नियमित 6 ते 8 तास झोप घ्या. थोड्या कामानंतर थकवा जाणवू नये यासाठी आपण योगा करणे, ध्यानधरणा करणे, शारीरिक व्यायाम करणे अशा गोष्टी करू शकता.
आपल्याला स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.