पहिल्या महायुद्धाची साक्षीदार आर्मी स्प्रिंग सायकल

आपल्या पैकी बऱ्याच जणांनी अशीही बनवा बनवी हा सिनेमा पाहिला असेल. त्यात कामावर उशीरा गेलेला धनंजय माने सायकल पंक्चर झाली म्हणून त्यांच्या बॉस ला कारणं सांगत असतात सायकल च्या ट्यूब किती सुमार दर्जाच्या आहेत वैगेरे. पण असा कधी विचार केलाय का सायकल ला ट्यूब नसती तर.

ज्यांना थोडं फार भौतिकशास्त्र माहीत असेल ते सांगू शकतील की जर सायकल ला किंवा वाहनांना ट्यूब नसेल तर त्या चाकाचे हादरे किंवा वायब्रशन्स इतके बसतील की ती सायकल चालवण वैतागवाणं ठरेल. मग अजून काय करता येऊ शकतं जेणे करून अशी सायकल रस्ता विरहित जागे वरून चालवता यावी आणि चालकास जास्त त्रास ही व्हायला नको. आपण ज्या सायकली बद्दल बोलतोय ती आजच्या काळातील सायकल नाही तर पहिल्या महायुद्धाच्या काळात बघुयात अशा एका जादूई सायकल बद्दल.

पहिल्या विश्व युद्धाच्या काळात जर्मन मिलेटरी कडे एक विशीष्ट प्रकारची सायकल वापरली जायची त्या सायकल च नाव होतं स्प्रिंग व्हील. सायकल च्या पुढच्या चाकावर दर्शनी भागी एक घडी घालून ठेवता येईल असं कॅररीर असायचं.

दोन चाकांना जोडणारी जी फ्रेम असायची त्या फ्रेम च्या मध्ये एक झोळी सारखी जाड कापडी किंवा चामड्याची थोडंफार सामान किंवा सरकारी कागदपत्रांची नेआण करणारी पिशवी असायची. सायकल लांबून दिसताना सामान्य सायकलींप्रमाणे दिसायची पण खास आवर्जून उल्लेख करणारी बाब म्हणजे त्या सायकल च चाकं.

पहिल्या महायुद्धात जर्मन मध्ये रबरी वस्तूंचा प्रचंड तुटवडा झाला होता अश्या मध्ये सायकल च्या ट्यूब बनवणारे कारखाने बंद झाले होते. त्या काळात दळणवळणाच्या सोई अगदी मोजक्याच असायच्या. त्यामुळे सरकारी कागदपत्रे किंवा संदेशाची ने आण करण्यासाठी सायकल वापरल्या जायच्या पण आडवळणाच्या रस्त्यामुळे ट्यूब खराब होत असे मग अश्या सायकलीना छोट्या जाड आणि मजबूत स्प्रिंग लावलेल्या चाकाचा वापर केला जात असे.

अश्या सायकलींच उत्पादन मॅक्स फ्रँकस्टीन बर्गर आणि ओटेस्टाईन यांनी मोटारसायकल सोबतच सुरू केलं. या दोघांनी १८८६ साली नुरेमबर्ग येते आपली कंपनी सुरू केली ज्यात त्यांनी व्हिक्टोरिया या ब्रँड ठेवून सायकली बनवल्या. युद्ध काळात उपयोग पडलेली ही सायकल काळाच्या ओघात इतिहासाच्या पानांत लुप्त होत आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page