सोलापूर शहरात किल्याची पाहणी करत असताना एका इंग्रज अधिकाऱ्याला सापडलेले हे रहस्यमय शिव मंदिर

महाराष्ट्रात अनेक पुरातन मंदिरे आहेत आणि त्यांच्या विषयी शोध इतिहासाचा ह्या फेसबुक पेजवर आम्ही नियमित माहिती देत असतो; हि माहिती आपल्याला नियमित वाचायला मिळण्यासाठी आपण शोध इतिहासाचा फेसबुक पेज लाईक/ फॉलो करून ठेवा. आज आपण सोलापूर जिल्हातील श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

इ. स. १९१७ च्या सुमारास सोलापूर शहरातील भुईकोट किल्ल्याची पाहणी करण्याचे काम करत असलेल्या  सिमकाँक्स या इंग्रज अधिकाऱ्यास किल्ल्याच्या उत्तर दिशेला असणाऱ्या तटबंदीच्या आतल्या बाजूला काही दगडी खांब दृष्टीस पडले.

मग त्या इंग्रज अधिकाऱ्याने तत्कालीन गव्हर्नरच्या परवानगीने त्याठिकाणी उत्खनन केल्यानंतर एक चालुक्यकालीन बांधकाम शैलीचे मंदिर त्या ठिकाणी असल्याचे आढळून आले.

मंदिर स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना असून यावर कोरण्यात आलेली कलाकुसर अतुलनीय आहे. मंदिर पूर्णतः दगडी बांधकामाचे असून मंदिराची सर्वसाधारण संरचना मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी आहे.

तसेच मंदिराच्या स्तंभांवर सुंदर कोरीवकाम केलेल दिसते. या मंदिराचे वेगळे वैशिट्य असे की सभामंडपाखाली असलेला गुढमंडप. सभामंडपाच्या दोन्ही बाजूस कक्षासाने आहेत. त्या ठिकाणी असलेल्या वास्तूंवर सुंदर नक्षीकाम करण्यात आलेल आहे.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार श्री. शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराज यांनी श्री शैलम या ठिकाणाहून आल्यानंतर त्यांनी या मंदिराची स्थापना केली. असा उल्लेख इ.स. १३ व्या शतकात कन्नड महाकवी राघंवांक यांनी सिद्धराम चरित्र या काव्यग्रंथात केल्याचे आढळत.

तसेच या मंदिरात असलेल्या शिवलिंगाची स्थापना श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांनी केली असेही म्हटले जाते. त्यामुळे महाशिवरात्रीला सोलापूर शहरातील भाविक मोठ्या प्रमाणात येतात.

आपल्याला श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराविषयी असणारी ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page