आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आम्हाला मेसेज करून विचारले होते कि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करता येऊ शकत. आज आम्ही आपल्याला ह्या प्रश्नांचे उत्तर घेऊन आलो आहोत. हि माहिती महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत वाचा. स्मरणशक्ती कमजोर असणे म्हणजे वाचलेल्या, पाहिलेल्या, ऐकलेल्या गोष्टी लक्षात न राहणे, ठेवलेल्या गोष्टी विसरणे.
स्मरणशक्ती जस वय वाढत तशी कमी होते असा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. मात्र जर आपण पोषक आहार घेतला, नियमित व्यायाम केला, दिवसातील पंधरा मिनिटं ध्यानधारणा आणि योग केला, नियमित पुरेशी झोप घेतली, भरपूर पाणी प्यायले तर आपली स्मरणशक्ती कायम चांगली राहू शकते.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण पोषक आहार घेणे गरजेच असते. पोषक आहार म्हणजे असा आहार ज्यामधून आपल्याला ओमेगा 3 एसिड हा पोषक घटक मिळेल असा आहार सुक्यामेव्यामध्ये ओमेगा 3 एसिड असते.
म्हणून स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी बऱ्याचदा बदाम, अक्रोड अशा सुक्यामेव्याचे सेवन करायला सांगितले जाते. देशी गायीच्या दुधामध्ये शरीराला आवश्यक असणारे सगळे पोषक घटक असतात.
म्हणूनच लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसीक विकासासाठी देशी गायीचे दुध दिले जाते. स्मरणशक्ती चांगली करण्यासाठी आपण देखील गायीच्या दुधाचे सेवन करू शकता.
या बरोबरच देशी गायीच्या दुधापासून बनवेल तूप खाल्याने देखील स्मरणशक्ती चांगली व्हायला मदत मिळते.आपल्या आहारामध्ये फळे, हिरव्या भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असू द्या.
स्मरणशक्ती चांगली होण्यासाठी आपण मानसीक तणावापासून दूर राहणे गरजेच असते. जितका आपण मानसीक तणाव घ्याल तितकी आपली स्मरणशक्ती कमजोर होईल त्यामुळे मनशांत राहण्यासाठी आपल्या आवडीचे संगीत ऐका, ध्यानधारणा करा.
राग येणे हा स्वभाव गुण आपल्यात असेल तर आपली स्मरणशक्ती कमजोर होऊ शकते म्हणूनच शक्य तितके रागावर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करा.
स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी रात्री नियमित 7 ते 8 तास झोप घेणे गरजेच आहे. तसेच सकाळी झोपेतून उठल्यावर दात घासल्यानंतर एक ग्लास पाणी प्यायला विसरू नका.
वाचन केल्यावर, ऐकल्यावर, पाहिल्यावर गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी काही वेळाने आपण जे वाचले आहे, ऐकले आहे, पाहिले आहे; ते आठवायचा प्रयत्न करा. असे केल्याने स्मरणशक्ती चांगली व्हायला मदत होईल.
स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी आवळ्याचा सरबत, संत्र्याचा रस, सफरचंद, तीळ, पालक, गाजर, बीट अशा गोष्टींचा आहारात समावेश असू द्या.
रात्री झोपण्याआधी तिळाच्या तेलाने हलक्या हाताने तळपायांची मालिश केल्याने आपल्याला शांत झोप लागेल. शांत झोप लागल्याने आपल्या मेंदूला पुरेसा आराम मिळेल. आपल्याला स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.