हातावर “स्कीन पिलिंग” होत असल्यास करा हे घरगुती उपाय

वातावरण बदलामुळे त्वचा कोरडी पडते; बऱ्याचदा पावसाळा सुरु झाल्यावर थंडी सुरु झाल्यावर हाताची त्वचा जायला सुरुवात होते, कपडे धुवायच्या डीटरजेन्ट पावडरने, केमिकलयुक्त साबणाच्या वापराने देखील स्कीन पिलिंगचा त्रास होऊ शकतो.

आपल्या हातांवरील त्वचा निघून जात असल्यावर वेदना होऊ नये यासाठी काही घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. हातांवरील त्वचा जात असल्यास एका भांड्यात कोमट पाणी घ्या त्यामध्ये 2 चमचे ग्लिसरीन मिसळा.

त्यानंतर आपले हात त्यात बुडवून ठेवा. असे केल्याने आपल्या हातावरील त्वचा कोमल होईल आणि आपल्या होणाऱ्या वेदना देखील कमी होतील. हातांवरील त्वचा जात असल्यास रात्री झोपायच्या आधी हातांवर विटामिन ई तेल लावा.

विटामिन ई तेल हातांवर लावल्याने हात खुप काळापर्यंत मॉईश्चराईज राहण्यास मदत होईल. रात्री झोपायच्या आधी कोरफड गर किंवा कोरफड जेल हातांना लावा. सकाळी झोपेतून उठल्यावर हलक्या कोमट पाण्याने हात धुवा. असे केल्याने हाताची त्वचा मऊ होईल.

पावसाळ्यात त्वचा कोरडी पडून आपल्या त्वचेचे नुकसान होऊ नये यासाठी आपल्या आहारात काजू, बदाम, अंजीर, अक्रोड, शेंगदाणे, तीळ अशा विटामिन ई समृद्ध ड्रायफ्रुटचा समावेश करा.

त्वचेची आद्रता टिकून राहण्यासाठी दिवसभरात 3-4 लिटर पाणी प्या. त्वचा कोरडी पडणार नाही याची काळजी घ्या. साबणाचा, डीटरजेन्ट पावडरचा वापर करायचा झाल्यास हातांमध्ये रबरी मोजे घाला.

आम्हाला आशा आहे कि हातावर “स्कीन पिलिंग” होत असल्यास कोणकोणते घरगुती उपाय केले पाहिजे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगाल; ह्या माहितीविषयी आपल्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशीच माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा. पोस्ट नोटीफिकेशन सुरु करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page