श्री स्वामीनारायण मंदिर माहिती

नमस्कार, आपले शोध इतिहासाचा वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण श्री स्वामीनारायण मंदिराविषयी जाणून घेणार आहोत. मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आंबेगाव या ठिकाणी ३२ एकर परिसरात भारतीय शिल्पकलेने नटलेले हे भव्य मंदिर फेब्रुवारी २०१७ मध्ये बनवण्यात आलेले आहे.

हे मंदिर 140 कोरीव खांबांवर उभे आहे. संपूर्ण मंदिर हे राजस्थानी वाळूच्या दगडाने बनवण्यात आलेलं आहे. आपल्याला खर वाटणार नाही पण ह्या मंदिराचे बांधकाम फक्त 24 महिन्यांत पूर्ण झाल आहे.

मंदिर परिसर स्वच्छ आणि प्रसन्न असा आहे. मंदिराच्या आजूबाजूला पाण्याचे कारंजे, गार्डन आहेत. आपण ह्या ठिकाणाला भेट दिल्यानंतर गिफ्ट शॉप, अभिषेक मंडप, आणि मुख्य मंदिर अशा गोष्टी पाहू शकता.

ह्या ठिकाणी दररोज सकाळी ११:१५ वाजता होणारी मध्यान्ह आरती विशेष असते. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल फोन आणि कॅमेरा वापरण्यास प्रतिबंध आहे.

मंदिर दर्शनाची वेळ – सकाळी ७:३० पासून दुपारी १२:०० पर्यंत तसेच दुपारी ४:०० ते ८:३० वाजेपर्यंत आपण ह्या ठिकाणी दर्शन घेऊ शकता. पुणे रेल्वे स्थानकापासून हे मंदिर १५ किलोमीटर अंतरावर आहे. आणि पोहोचण्यासाठी साधारणपणे १ तास इतका वेळ लागतो.

पुणे मनपा बस स्थानकापासून हे मंदिर १२ किलोमीटर अंतरावर आहे. आणि पोहोचण्यासाठी साधारणपणे ३० मिनिटे इतका वेळ लागू शकतो.

आपल्याला श्री स्वामीनारायण मंदिराविषयी हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अश्याच चांगल्या माहितीसाठी रोज शोध इतिहासाचा फेसबुक पेजला भेट द्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page