दत्तांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्री क्षेत्र कुरवपूर तीर्थक्षेत्र माहिती

महाराष्ट्रात दत्त संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. दत्त संप्रदायाचे पालन करणारे भाविक श्री दत्त मंदिर परिक्रमा करत असतात. या परिक्रमेतील एक महत्वपूर्ण ठिकाण म्हणजे कुरवपूर. श्री दत्तांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचे निवासस्थान म्हणजेच हे कुरवपुर ठिकाण; चला तर मग आज जाणून घेऊयात कुरवपूर या तिर्थक्षेत्राबद्दल.

कुरवपूर हे प्राचीन तीर्थक्षेत्र कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमेवर आहे. हे ठिकाण कृष्णा नदीच्या एका बेटावर वसले आहे. याठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी 14 वर्षे वास्तव्य केले. त्यामुळे दत्त संप्रदायामध्ये या ठिकाणाला अत्यंत महत्त्व आहे. दरवर्षी भाविक याठिकाणी दर्शनासाठी जातात.

चहू बाजूंनी पाण्याने वेढलेल्या बेटावर हे ठिकाण आहे. रायचूर या कर्नाटकातील ठिकाणापासून ३० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आतकुर हे गाव लागते. या गावातून बेटावर जाण्यासाठी नावेने प्रवास करावा लागतो.

“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”  या नामघोषात मंदिराचा परिसर दुमदुमत असतो. गुरुचरित्र या ग्रंथामध्ये दत्तांच्या प्रथम अवतारा विषयी अनेक कथा सांगितल्या आहेत.

श्रीवल्लभ यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी गृहत्याग केला. संपूर्ण भारत भ्रमण केल्यानंतर ते कुरवपूर याठिकाणी आले. त्यामुळे येथे श्रीपाद श्री वल्लभ यांचे मंदिर पहायला मिळते. त्यांच्या नित्य पादुकांचे पूजन दत्त भक्त करतात.

तसेच याच ठिकाणी टेंबे स्वामी यांना “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ” या मंत्राचा साक्षात्कार झाला. श्रीपाद श्रीवल्लभ यांनी बरेच वर्षे येथे तपश्चर्या केली. हे तीर्थक्षेत्र आज संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झाले आहे.

गुरुद्वादशी, गुरु पौर्णिमा, दत्त जयंतीला इथे मोठा उत्सव होतो. हे ठिकाण जागृत असल्याने गाभाऱ्यामध्ये पुजाऱ्यांशिवाय कोणालाही जाण्यासाठी परवानगी नाही. त्यामुळे भक्तांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते.

येथे असणाऱ्या पादुकांची नित्य पूजा, होम हवन, अभिषेक होतो. तसेच पारायण केली जातात. भाविकांना राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय असल्याने संपूर्ण भारतभरातून दत्तभक्त येथे येत असतात.

आपल्याला श्री क्षेत्र कुरवपूर तीर्थक्षेत्राची हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page