मराठ्यांच्या इतिहासाचा आणि कर्तृत्वाचा डंका छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्या कर्तृत्ववान मराठ्यांमुळे जगभर पोहोचला. हे आपण प्रेमापोटी बोलत असतो पण आता ही गोष्ट प्रेमापोटी नाही तर खरोखर आहे.
कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एक बातमी द लंडन गॅझेट मध्ये शिवरायांच्या हयातीत इंग्लंड मध्ये छापून आली होती. विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही बातमी त्यावेळी पहिल्या पानांवर छापून आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर टाकलेल्या दुसऱ्या छाप्याची बातमी या दैनिकात २० फेब्रुवारी १६७२ या दिवशी छापून आली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीची माहिती सुरतेत असणाऱ्या इंग्रजी अधिकाऱ्यांनी द लंडन गॅझेट या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला पत्र स्वरूपात पाठवली होती. ती जशीच्या तशी छापताना ‘द लंडन गॅझेट’च्या संपादकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील राजकीय महत्त्व हळू हळू वाढत होते. आणि जगाच्या पाठीवर ब्रिटिशांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना गंभीरपणे घ्यायला लागले होते.
कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, Rebale म्हणजे एक क्रांतिकार असा केला आहे. ज्यानी मोघलांना अनेक लढायांत चारीमुंड्या चीत केले आहे. ते आता जवळजवळ संबंध देशाचे शासनकर्ते बनत आहेत.
‘द लंडन गॅझेट’ हे राजाचे अधिकृत मान्यता असलेले वृत्तपत्र होते. ‘लंडन गॅझेट’मधील बातम्या सर्वांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून ते युरोपातील इतर शहरे यांच्या सोबतच उत्तर अमेरिका आणि आशियातल्या इंग्रज वसाहतींकडे पाठवण्यात येत असे.
या वृत्तपत्रात जगभरातील परंतु अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या घडामोडीच केवळ छापल्या जायच्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची बातमी पहिल्या पानावर आणि पहिल्या रकान्यात येणे म्हणजे ही गोष्ट नक्कीच महत्त्व आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती ही मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहेच. पण आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे आणि जागतिक दर्जाचे योद्धे म्हणूनही शिवरायांची ओळख आहे. यातील आणखी एक विशेष म्हणजे शिवाजी महाराज ज्यांच्याशी लढले त्यांनीही महाराजांचे श्रेष्ठत्व मान्य केले होते.
त्यांच्यातील नेता, धुरंधर सेनानी, जाणता राजा ही आणि अशा असंख्य गुणांची ओळख समाजाला पदोपदी होत होती. महाराजांचा काळ लोटून इतकी वर्षं झाली तरीही त्यांचे इतिहासातील स्थान आणि मान याला जराही धक्का लागू शकत नाही. त्यांच्याबाबत जागतिक स्तरावर बोलल्या जाणाऱ्या गोष्टी भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने अभिमानास्पद आहेत.
महाराजांच्या सुरतेवरील या स्वारीचे तपशीलवार वर्णन यूरोपीय वखारवाल्यांच्या कागदपत्रांतून आढळते. या हल्ल्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव परदेशातही चर्चिले जाऊ लागले.
सुरतेहून आणलेल्या लुटीतून त्यांनी दक्षिण कोकणातील सिंधूदुर्ग बांधला आणि मराठा आरमाराचा विस्तार केला. याची सुरवात त्यांनी कल्याण-भिवंडी घेऊन यापूर्वीच सुरू केली होती. पश्चिम किनाऱ्याचे रक्षण आणि आरमाराला सुरक्षितता या हेतूने शिवाजी महाराजांनी ठिकठिकाणी जलदुर्ग बांधले. यूरोपीयांच्या राजकीय डावपेचावर महाराजांचे सतत लक्ष असे.
Dhanya the great Maratha warriors