शिवरायांच्या हाताचे अन पायाचे ठसे असलेला किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘जंजिरा’ जिंकण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. पण दुर्दैवाने जंजिरा स्वराज्यात येऊ शकला नाही. पण जंजिरा स्वराज मध्ये येत नाही म्हणून हताश न होता छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांना सांगून दुसरा जंजिऱ्या सारखा जलदुर्ग बांधण्याचं निश्चित केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सूरतेची मोहीम यशस्वी करून आले. त्यावेळी त्यांना स्वराज्यासाठी फार मोठं धन लाभलं.

सूरतेच्या छाप्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज काही दिवसांनी तळ कोकणाच्या स्वारीवर गेले असता त्यांना मालवणच्या किनाऱ्यावरुन एक मोठं बेट दिसलं. महाराजांना ती जागा प्रचंड आवडली कारण चोहोबाजूंनी समुद्र असून सुद्धा या बेटावर चक्क गोड्या पाण्याचे झरे होते. याच बेटांवर महाराजांनी दुसरा जंजिरा बांधण्याचं ठरवलं. 

महाराजांना सूरतेवरील छाप्यात जे धन मिळालं होतं ते त्याचा वापर या किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलं. यासंदर्भात काही पत्रव्यवहार देखील उपलब्ध आहेत. हिरोजी इंदुलकर यांच्या हस्ते किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले. पण याच दरम्यान मिर्झा राजे जयसिंग याने स्वराज्यावर आक्रमण केलं. आणि दुर्दैवाने महाराजांना मिर्झा राजा सोबतशी तह करावा लागला.

या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीला जावं लागलं. तोपर्यंत इकडे किल्ल्याचं बांधकाम चालू होते. दिल्लीतून सुखरूप परतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी मालवणच्या या किल्ल्याची पाहणी केली. यावेळी किल्ला जवळपास पूर्णत्वास आला होता. त्यानंतर काही दिवसांमध्येच किल्ला पूर्ण झाल्याचं महाराजांना समजल्यावर त्यांनी किल्ल्याची पाहणी करण्यासाठी कोकणात जायचे ठरवले.

छत्रपती शिवाजी महाराज किल्ला पाहण्यासाठी कोकणात आले किल्ला पाहता क्षणीच त्यांना किल्ला फार आवडला. महाराजांनी किल्ल्याचं नाव ‘सिंधुदुर्ग’ असं ठेवलं. किल्ला पाहून राजांना प्रचंड आनंद झाला. यावेळी राजांनी किल्ल्याचं बांधकाम करणाऱ्या मजुरांना बक्षीस देण्याचं ठरवलं.

पण स्वामिनिष्ठ मजुरांनी स्वत:ला काही मागण्याऐवजी किल्ल्याजवळ राजांच्या डाव्या पायाचा आणि उजव्या हाताच्या पंजाचा ओल्या चुन्यात ठसा घेतला. तसे ठसे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आज ही आहेत. तसेच काही इतिहास तज्ज्ञाचं देखील हेच मत आहे.

महाराजांच्या पायाचा ठसा जिथे घेण्यात आला तिथे एक अगदी छोटीशी देवळी करण्यात आलं आहे. पूर्वी याला एक काचेचा दरवाजा असावा. पण आता फक्त दरवाज्याची चौकट आहे. यामुळे राजांच्या पायाचा ठसा हळूहळू धुसर होण्याची शक्यता आहे.

हाताच्या पंजाचा ठसा जिथे राजांच्या पायाचा ठसा आहे त्यापासून अगदी जवळ पण थोड्याशा उंचावर राजांच्या हाताचाही ठसा आहे. पण आता हा ठसा जवळजवळ पुसट होत चालला आहे.पायाच्या ठशासाठी जशी देवळी बांधली आहे तशीच हाताच्या ठशासाठी देखील देवळी बांधली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page