छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विस्तार चंद्र कले प्रमाणे वाढत जात होतं. शाहिस्तेखानाने स्वराज्य भयंकर नुकसान केलं. स्वराज्याची झालेली मोठी हानी पाहता. स्वराज्याचा खजिना रिकामा राहून चालणार नव्हते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा घातला.
६ ते ९ जानेवारी चार दिवस मुघलांच्या सुरत शहराच्या नाकी नऊ आणले होते. सुरत मध्ये मिळालेला आणलेल्या खजिन्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधून स्वराज्याच्या आरमाराचं बळकटीकरण करण्यास सुरुवात केली.
स्वराज्याचा वाढता विस्तार पाहता. औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. ३ मार्च १६६५ रोजी मिर्झा राजे मोठी फौज घेऊन स्वराज्यात दाखल झाले.
मिर्झा जयसिंहाचा महत्त्वाचा सेनापती दिलेरखान याने पुरंदरला वेढा घातला. स्वराज्याचं होणार नुकसान पाहता आणि स्वराज्याचा महत्वाचा शिलेदार मुरारबाजी देशपांडे यांच्या मृत्य झाला. महाकाय मोगलांच्या सेने पुढे पुरंदर चा निभाव लागणं केवळ अशक्य होतं. म्हणून छत्रपती शिवरायांना नाईलाजाने तह करावा लागला.
११ जून १६६५ रोजी शिवाजी महाराजांनी जयसिंह यांच्यात तह करावा लागला. ज्यात स्वराज्याचे २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले. या बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला जाऊन बादशाहाची भेट घ्यावी लागली.
मोजका सरंजाम आणि संभाजी यास घेऊन महाराज ५ मार्च १६६६ रोजी आग्र्यास जाण्यास निघाले. १२ मे १६६६ साली आग्र्याला पोहोचले. औरंगजेबाच्या दरबारी औरंगजेब ने महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान केला.
आग्र्याच्या दरबारी झालेल्या या प्रकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा क्षोभ अनावर झाला. १७ ऑगस्ट १६६६ साली छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज फौलादखान च्या वेढ्यातून निसटले.
२० नोव्हेंबर १६६६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात परतले. तर काही दिवसांनी युवराज शंभूराजे देखील स्वराज्यात सही सलामत आले. स्वराज्यात आल्यावर छत्रपती शिवरायांनी कोकण किनाऱ्यावर आपल्या आरमाराची बळकटी करण्यास प्राधान्य दिलं. या मोहिमेत पोर्तुगीजांचं खूप मोठं नुकसान झालं.
शेवटी पोर्तुगीजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर तह करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण त्यांची नीती आणि मुसद्दी पणा पाहुन पोर्तुगीज चांगलेच धास्तावले होते.
महाराजांबद्दल २७ जानेवारी १६६७ च्या एका पत्रात कॉस्मे दि गार्द हा पोर्तुगीज लिहतो. धुर्तपणा, चातुर्य, पराक्रम, चपळता आणि युद्ध प्रसंगी जी नीतीमत्ता वापरली जाते त्या बाबतीत शिवाजी राजा यांची तुलना करायची झाल्यास ती केवळ आणि केवळ ज्युलियस सिझर किंवा विश्वविजेता सिकंदर ह्याच्याशी करावी लागेल. अशी एकही जागा नाही जिथे शिवाजी राजे यांचा सबंध नाही यांची सैनिकांची ताकद इतकी आहे की आशियाशी युध्द करण्याची हिम्मत आहे.
मोगलांच्या मुख्य छावणीतून पेटाऱ्यातून एवढ्या मोठ्या वेढ्यातून सही सलामत सुटून आले. मोगल बादशहाजवळ लक्षावधी सैन्य असून सुद्धा पण त्याच्या सैन्याला न जुमानता त्यांनी सुरत शहर लुटले. मोगल सैन्याप्रमाणे अदिशहाचे सैन्य ही त्याच्या दुस-या बाजूस होते शिवाजी राजांनी त्याना ही जुमानले नाही.
जमिनीवर ज्याप्रमाणे वर्चस्व आहे तसाच समुद्रानरही त्यांचा दरारा आहे. आम्हाला शिवाजी राजांच्या आरमाराची भिती वाटते. कारण, समुद्र किना-यावर किल्ले बांधून किनारपट्टी मजबूत करत आहे. त्यांच्या जवळ असलेल्या नौका जरी मोठ्या नसल्या तरी ब-याच लहान सरपटणाऱ्या लढाऊ नौका त्याच्या पाशी आहेत. त्यांना नामोहरण करणं अशक्य आहे.