आज काल आपण राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून म्हणा किंवा शिवजयंती च्या दिवशी सोशल मिडिया वर महाराजांचे फोटो ठेवून महाराजांच्या प्रति असलेली कृतज्ञता दर्शवतो.
आता नुकताच झालेला राज्याभिषेक सोहण्याच्या निमित्ताने आपल्यापैकी बऱ्याच जणांनी शिवाजी महाराज हत्तीवर बसून राज्याभिषेकासाठी जात असल्याचा प्रसंग दर्शवणारं तैलचित्र पाहिलं असेल. ते चित्र बहुतेक वासुदेव कामत यांनी रेखाटलं असावं. ते चित्र पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे रायगड तसा चढायला अवघड असा गड आहे मग अश्या अवघड गडावर हत्ती गेला कसा. आणि खरोखरच राज्याभिषेकाप्रसंगी गडावर हत्ती होते का?
छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी भाषेतील पहिले चरित्रलेखन कृष्णाजी अनंत सभासद यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याचं महत्व कित्ती होतं आणि का शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याची गरज किती होती याच वर्णन करताना सभासद म्हणतात संपूर्ण पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाही चं राज्य असताना मराठा पातशहा छत्रपती जाहला ही सामान्य गोष्ट नाही.
कृष्णाजी सभासद यांनी स्वतः शिवराज्याभिषेक पाहिला आणि याचं वर्णन त्यांनी केलं. राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार च त्यांनी १६९६ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले. आणि शिवराज्याभिषेक झाला ६ जून १६७४ साली इतक्या वर्षांनंतर देखील सभासदांनी इतकं जिवंत पद्धतीने राज्याभिषेकाच वर्णन केले म्हणजे याचं महत्व किती होतं आणि सामान्य जनतेच्या भावना त्या प्रसंगी काय असतील याचा विचार करूनच मन भरून येतं.
शेकडो वर्षांची परकीय राजवट धुडकारून लावत, पाहिलेला हा सुवर्ण काळ रायगडाने पाहिला आणि अनुभवला सुध्दा. रायगडाने आजतागायत अनुभवलेला सर्वोत्तम दिवस ज्याची क्षणांची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली तो दिवस म्हणजे “जेष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १५९६” अर्थात शिवराज्याभिषेक या राज्याभिषेक सोहळ्याला देश विदेशाहून पाहुणे आले होते, मोठमोठे रती-महारती, मातब्बर सरदार गडावर हा सोहळा पाहण्यासाठी हजर होते. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी पाहता आणि मराठ्यांच्या आरमाराचा विस्तार पाहता या सोहळ्याला इंग्रजांनी देखील हजेरी लावली होती.
वाढत्या स्वराज्याचा विस्तार पाहून छत्रपती शिवरायांच्या सोबत व्यापारी हित संबंध वाढावे त्यासाठी व्यापारी तह करण्याच्या हेतूने इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन सुद्धा राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित होता. त्याने केलेल्या वर्णनात त्याने लिहून ठेवलं त्याचा मराठी अनुवाद असा, राजा शिवाजी यांनी त्यांच्या लोकांच्या कल्याणासाठी स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला.
रायगड हा सोहळा पाहण्यासाठी भरून गेला होता. मी आणि माझे सहकारी गडावर फिरत असताना राजसदरेच्या बाहेर आलो. तर त्यावेळी दोन छोटे हत्ती त्या भल्या मोठ्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला उभे होते तसेच दोन शुभ्रसफेद रंगाचे घोडे ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते.
घोडे आणि हत्ती दोघांना सोनेरी वस्त्रांनी सजावले होते. मला या गोष्टी चं आश्चर्य वाटतं की गडाचा मार्ग इतका बिकट असून देखील हे भले मोठे पशु कोठुन वर आले असावे! यासंदर्भातील पुरावा आपल्याला शिवकालीन पत्र सार संग्रह १६४३ मध्ये उपलब्ध आहे.
शिवदिग्विजय बखर मध्ये उल्लेख आढळतो छत्रपतींचा केलेला अभिषेक हा वैदिक पद्धतीचा होता हा राज्याभिषेक त्याकाळातील प्रख्यात ज्ञानी पंडित गागाभट्ट यांनी केला. राज्याभिषेकाच्या जागी महादरवाजातून निघणाऱ्या रथाचा आस किंचित वाकला होता म्हणून मग राजा गजारूढ झाले असा उल्लेख आहे.
वि वा जोशी यांच्या राजधानी रायगड या पुस्तकात देखील गजाच वर्णन आलं आहे ते असं, सुलक्षणी सोन्याच्या साजाने शृंगारलेल्या व मोत्यांची झूल घातलेल्या अश्वावर आरूढ होऊन महाराज महादरवाजा समोरील पटांगणात आले. तेथे सोन्याच्या अलंकारांनी सजवलेल्या हत्तीच्या अंबारीत बसले.
हत्तीच्या गंडस्थळावर सेनापती हंबीरराव मोहिते बसले होते. मुख्यप्रधान मोरोपंत खवासखान्यात मोर्चेल घेऊन होते. मिरवणुकीत सर्वांपुढे जरीपटका व भगवे निशाण दोन हत्तींवर फडकत होते.
चिटणीस बखरी मध्ये देखील हत्तीचा उल्लेख आढळतो ज्यात अंबारी मध्ये महाराज येत असल्याचा उल्लेख आहे. यासोबतच एक इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन हा स्वतः सोहळ्यास उपस्थित होता. त्याने राज्याभिषेकाचा हा प्रसंग त्याच्या ऑक्झेंडन डायरी मध्ये देखील.
गागाभट्ट यांनी अश्वांची व गजांची समंत्र पूजा केली. व महाराज गजावर बसून नगरास प्रदक्षिणा घालून देवालयांत जाऊन देवाची पूजा केली. आणि त्यानंतर राज्याभिषेक सोहळा पार पडला. वरील सर्व उल्लेख पाहता राजधानी रायगडावर शिवराज्याभिषेकाच्या शुभ प्रसंगी हत्ती राज्याभिषेका प्रसंगी असतील हे नक्कीच होते.
होय, महाराजांनी हत्तीची पिल्ले रायगडावर आधीच नेलेली होती. ही गोष्ट रायगड मधील स्थानिक आज सुद्धा सांगतात.