महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या डोंगर रंगावर अनेक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गडकिल्ले आहेत. या गड किल्ल्यांचा इतिहास पहिला तर तो सातवाहनांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत जाऊन पोहोचतो. असे अनेक गडकिल्ले आहेत जे इतिहासात प्रसिद्ध आहे परंतु त्या गड किल्ल्याचं भौगोलिक वेगळे पण देखील तितकंच वैशिष्ट्यपूर्ण आहे.
त्या किल्ल्याचं वेगळे पण इतकं खास असतं की आज ही आपल्याला अचंबित व्हायला होतं. त्या पैकीच एक दुर्लक्षित दुर्ग रत्न म्हणजे सातारा जिल्ह्यातील पाटणजवळील दातेगड. चारही बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचं वैशिष्ट्यं म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू कातळ चिरून त्या दगडात खोदून घडवल्या आहेत.
गड्याच्यामाथ्यावर पसरलेल्या पठारावर तलवारीचा भव्य आकार असलेली विहीर हेही याचं प्रमुख वैशिष्ट्य. पाटण तालुक्यापासून जवळच हा गड आहे पाटणच्या बस स्थानकापासून सहा किलोमीटर अंतरावर हा गड आहे.
कराड-कोयनानगर मार्गावरील रस्त्याने पाटण सोडून पुढे आल्यावर चाफोली गावाकडे एक रस्ता जातो, त्या रस्त्यानं चालत गेलं की गडावर जाता येत. गडाच्या पायथ्याचं टोळेवाडी गाव आहे त्यागावतील स्थानिक लोकांची मदत घेऊनच जावं लागतं कारण हा परिसर डोंगराळ असल्यानं आणि जंगलामुळे भरकटण्याची शक्यता आहे.
स्वराज्यात टेहेळणी गड म्हणून चोख कामगिरी बजावणाऱ्या दातेगडावर झालेल्या दुर्ग संमेलनानंतर या गडाचे रूपडे पालटू लागले आहे. आणि गडाची ख्याती हळू हळू महाराष्ट्रभर होत आहे. गडाच्या पश्चिम बाजूस भग्न प्रवेशद्वार आहे.
कोयना परिसरात झालेल्या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे गडाचं बरंच नुकसान झालं. गडावर तलवारीचा आकार असलेली भव्य विहीर आहे. ती इतिहासकालीन शिल्पकलेची जादू दाखवते. किल्ल्याच्या पश्चिम टोकावर अखंड खडकात खोदलेली ही विहीर स्थापत्यसौंदर्याने भुरळ पाडते.
शिवकालीन स्थापत्यसौंदर्य या तलवारीच्या विहिरी पर्यंत मर्यादित न राहता. विहिरीपासून जवळच अखंड खडकात खोदलेलं गणपती आणि मारुतीचं देखणं मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या उतराव्या लागतात, या मंदिरावर कोणतंही आच्छादन नाही.
चौकोनी आकाराच्या खोदकामात दक्षिणाभिमुख गणपती आणि पश्चिमाभिमुख मारुती अशा कोरीव मुर्त्या कोरलेल्या आहेत. या दोन्ही मंदिराचं वैशिष्ट्य असं, की सूर्योदयाच्या वेळेस सूर्यकिरणं थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात आणि सुर्यास्त च्या वेळेला किरणं मारुतीच्या मूर्तीवर येतात.
आता जरी याचं कौतुक वाटत नसेल पण जेंव्हा तुम्ही स्वतः हा अनुभव घ्याल तेंव्हा पूर्व इतिहासातील शिल्पकारांची बौद्धिकता कित्ती दांडगी आहे हे समजून येईल. गडासमोर एक उंच टेकडी आहे, या टेकडीचा पूर्वी टेहळणी टेकडी म्हणून उपयोग केला जात होता.
अखंड खडकातील विहिरीत उतरण्यासाठी ५० पायऱ्या आहेत. त्यापैकी काही पायऱ्या ढासळलेल्या अवस्थेत आहेत. या पायऱ्यांवरून विहिरीत उतरल्यानंतर विहिरीच्या मध्यभागी पश्चिम बाजूला महादेवाचं मंदिर खोदलंय. मंदिराचा आकार भव्य आहे आणि या वरूनच या विहिरीची भव्यता कलाकुसर किती व्यापक आणि रुंद असेल ते जाणवते. मंदिरात शिवलिंग असून, मंदिरापासून खाली काही अंतरावर पाणी आहे.
तलवार विहिरीची खोली किती हे सांगता येणार नाही. मात्र, वरून पाण्यात दगड टाकला, की विशिष्ट आवाज येतो. हे ऐकून माहीत झाल्यानं गडावर येणारा प्रत्येक माणूस विहिरीत दगड टाकून आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे विहिर दगडानं भरली आहे.
नमस्कार भाऊ
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत . पण आपल्याच छञपतींची तुलना आजपर्यंत कोणत्याच माणसाशी केली जाऊ शकत नाही पण हे परप्रांतीय हिजडे लोक छत्रपतींची तुलना मोदी बरोबर करत आहे . ज्या मोदीच कार्य आपल्या छत्रपतींसमोर काहीच नाही . खंत एवढीच वाटते लोकांना सांगून दाखवून पण ते या परप्रांतीय लोकांना काहीच प्रत्युत्तर देत नाही , असच चालत राहील तर पुढील काळात ते छत्रपती म्हणून मोदीच फोटो आपल्याच महाराष्ट्रात लावला जाईल.
फेसबुक वर छत्रपती व श्रीराम यांचा फोटो आहे तो सर्वानी आपल्या प्रोफाईल ला टाकावा ही नम्र विनंती जेणेकरून हे परप्रांतीय छत्रपतींची तुलना करणार नाही.