छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती ही मराठीचं नव्हे तर प्रत्येक भारतीय माणसासाठी अभिमानाची बाब आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख जगभर आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे आणि जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून आहे. हे फक्त मराठी माणूसच नाही तर त्याकाळात शिवाजी महाराजांच्या विरोधात असलेले देखील शिवरायांच्या पराक्रमाच्या नोंदी ठेवत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात आपल्या नेता, धुरंधर सेनानी, जाणता राजा ही आणि अशा असंख्य गुणांची ओळख साडे तीनशे वर्षांपासून पदोपदी होत आहे. महाराजांचा काळ लोटून इतकी वर्षं झाली तरीही त्यांचे फक्त इतिहासातील स्थान तर भक्कम आहेच. तर वर्तमान काळात आणि कदाचित भविष्यात ही त्यांच्या स्थानाला आणि मान याला जराही धक्का लागू शकत नाही.
देशी विदेशी लोकांना जर शिवाजी महाराजांच्या कडून एवढी प्रेरणादायी वाटत असतील तर आपण देखील काही तरी शिकलं च पाहिजे. आता नवीन उद्योग किंवा व्यवसाय करण्यासाठी शिवचरित्रातून आपल्याला काही प्रेरणा मिळते का पाहुयात.
कोणतेही काम करण्याची सुरवात केली पाहिजे त्याचे तोटे किंवा त्यात उणीवा काय आणि किती आहेत त्याकडे सुरवातीला लक्ष देऊ नका. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प केला तेंव्हा त्यांच्याजवळ केवळ निवडक सहकारी होते.
शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता हवी. कोणताही व्यवसाय करत असताना तुमच्या जवळ इच्छाशक्ती सोडून बाकी काही असलं तरी चालू शकेल. मेहनत करण्याची तयारी हवी कारण स्वराज्य ज्या पुण्यात उभं राहिलं त्या पुण्याची राख रांगोळी झाली होती असं असून सुद्धा शिवाजी महाराजांनी जगाला हेवा वाटेल असं स्वराज्य उभं केलं.
कोणत्याही गोष्टीचा अनुभव स्वतः घ्यायचा असतो. कारण आपण व्यवसाय किंवा कोणतं काम करताना आपण सल्ल्यातून जेवढं शिकतो त्याही पेक्षा जास्त आपण अनुभवातून शिकतो. जबाबदारी खांद्यावर येते ती वय काळ परिस्थिती पाहून येत नाही. शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकला तेंव्हा त्यांच्या जवळ लढाईचा अनुभव नसून सुद्धा वयाच्या केवळ सतराव्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं.
सहकारी ज्यांना सोबत घेऊन आपण काम करणार आहोत त्यांच्या वर विश्वास ठेवा. निवडक सहकारी असे निवडा जे तुमच्या वाईट परिस्थिती मध्ये देखील आपल्या सोबत असतील. स्वराज्य जे उभं राहिलं ते अश्याच विश्वासू सहकाऱ्यांच्या भरवश्यावर.
कोणतंही काम करताना ते काम नियोजन बद्धपध्दतीने करा. नियोजन न करता काम केलं तर प्रत्येक वेळी यश मिळेलच असे नाही. पण नियोजन बद्ध कामाची पूर्ण पणे हमी देता येते. पण हे नियोजन देखील तितकं अभ्यासपूर्ण असलं पाहिजे. शाहिस्तेखानला लाल महालात घुसून त्याला मारलं त्यासाठी किती नियोजन केलं असेल हे आपण बघूच शकतो.
व्यवसाय आहे म्हटल्यावर त्यात चढ उतार आलेच त्यात आर्थिक संकट आलं तर घाबरून जायचं नाही. शांत डोक्याने विचारपूर्वक निर्णय घेतले की ते चुकत नाही. अफझलखान च संकट आलं तेंव्हा शिवाजी महाराजांनी न घाबरता आलेल्या संकटाचा सामना करून अफझलखानाचं संकट कायमचं दूर केलं.
व्यवसायात जरी मोठा तोटा झाला तरी तो मान्य करत आपल्या कामावर लक्ष देऊन त्या चुका पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्या. कितीही मोठं नुकसान असलं तरी सगळं संपलं असं होतं नाही. कारण पुरंदर च्या तहात गेलेले तेवीस किल्ले देऊन सुद्धा स्वराज्य दुप्पट शक्तीने उभं राहिलं होतं.
वेळ येईल तेंव्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील तेंव्हा ते निर्णय घेताना मागे हटू नका. कारण असे कठोर निर्णय छत्रपती शिवरायांनी देखील घेतले होते. आग्र्याहून सुटका करून घेतल्यावर आपल्या नऊ वर्षांच्या मुलाला मागे ठेऊन शिवाजी महाराजांना स्वराज्यात यावं लागलं.
ग्राहक हीच देवता आहे त्यांना खूप ठेवलं तरच व्यवसाय जास्त वाढू शकेल. त्यामुळे लोकांशी सौजन्याने वागलं तर न जाणो कोणती व्यक्ती आपल्या बाजूने उभी राहील सांगता येत नाही. छत्रपती शिवरायांनी लोकांना आपलंसं केलं म्हणून आज साडे तिनशे वर्षानंतर ही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं.
लोकांची आवड जपा बाजारात मागणी कशाची आहे याकडे लक्ष द्या. बाजारात काय चालू आहे, आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत त्यांचा व्यवसाय कसा चालतो याकडे अधिक लक्ष असलं पाहिजे.
छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक मोहिमा यशस्वी का होत होत्या तर गुप्तहेर खात तितक्या ताकदीने माहिती गोळा करून शिवाजी महाराजांच्या कडे पोहोचवत होते त्यामुळे त्यांना निर्णय घेताना परिस्थिती काय आहे ते माहित होतं. कोणत्याही नवं उद्योजकांना या गोष्टी अभ्यासल्या तरी जोखीम पत्करून आपण व्यवसाय सुरू करू शकतो.