छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत कोणते?

भोसले हे मूळचे मेवाडचे सिसोदिया राजपूत. लोककथे प्रमाणे सिसोदिया वंश हा आदित्य वंश म्हणजे सूर्य ला मानणारा वंश. सूर्यवंशी क्षत्रिय म्हणवून घेत कारण ते सूर्यापासून स्वतःची वंशावळ सांगायचे. या घराण्यातील ग्रहादित्य किंवा गुहील या राजाला बालपणी एका दृष्टांतात कैलासपुरी नामक क्षेत्री महादेवांनी साक्षात्कारी दर्शन दिले व स्वतःचे चतुर्मुखी शिवलिंग तेथे स्थापले ज्याला एकलिंगेश्वर म्हणतात अशीही वदंती राजस्थानमध्ये आहे. 

त्यानंतर आलेल्या बाप्पा रावळने या एकलिंगजी महादेवास आपले आराध्यदैवत म्हणून स्वीकारले जे पिढीदर पिढी सुरू राहिले. पुढे १४ व्या शतकात जेव्हा त्याच्याच वंशातील सिसोदिया शाखेचे लोकं मेवाडचे अधिपती झाले तेव्हा त्यांनी तर चक्क हे राज्य एकलिंगेश्वराचे असून आपण त्याचे दिवाण म्हणजे सेवक आहोत म्हणून जनतेची सेवा केली, आजही एकलिंगजी मेवाडचे आराध्यदैवत आहे.

राजपूत हे क्षत्रिय असल्याने त्यांच्याकडे युद्धाची दैवत महादेव, भवानी, चामुंडा यांची उपासना करत असे व म्हणूनच प्रत्येक राजपूत कुळाची एक कुलस्वामिनी देवी असते. मेवाडची म्हणजेच गुहिलोत व नंतर सिसोदिया राजांची कुलदेवी होती बाणेश्वरी किंवा जिला वनमाता म्हणत.

हल्ली त्याचाच अपभ्रंश होऊन नाव बाण/बयन माता असे नाव आहे. अशी दंतकथा आहे की ही देवी मूळची गुजरातची पण नंतर तिचा प्रत्यय आल्याने गुहिलोत राजांनी तिला कुलदेवी म्हणून तिचे पूजन सुरू केले.

या सिसोदिया घराण्याचे दोन राजकुमार सज्जनसिंह व क्षेमसिंह जेव्हा आपल्या वडिलांवर नाराज होऊन दख्खनच्या पठारावर आले तेव्हा त्यांचे वंशज हळूहळू येथील संस्कृतीचाच एक भाग बनून गेले.

शिखर शिंगणापूर येथील शंभुमहादेव/एकेश्वर म्हणजेच कैलासपुरीच्या एकलिंगेश्वराचा अवतार म्हणून दक्षिणेकडे आल्यावर या सिसोदिया कुमारांच्या वंशजांनी त्या एकेश्वर शंभुमहादेवास कुलदैवत मानले व त्याची उपासना सुरू केली. पुढे सज्जनसिंह सिसोदिया याच्या कुळातील भैरव उर्फ भोसाजी यांच्या नावावरून भोसले असे आडनाव या घराण्यास पडले.

मराठी संस्कृतीत हे भोसले घराणे मिसळून गेले तसेच त्यांनी मराठी लोकांसारखेच दोन कुलदैवत, अर्थात एक मुख्य कुलदैवत जे शिखर शिंगणापूरचे शंभुमहादेव.

शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजांनी येथे इ.स. १६०० साली येथे एक मोठे तळे बांधले, त्यास पुष्करतीर्थ असे म्हणत; त्यालाच आता शिवतीर्थ म्हणतात.

दुसरे पाहुणी आलेली देव अर्थात कुलदेवी म्हणून भवानी मातेस स्वीकारले. आता भवानी मातेची पूजा भोसले कुळात कधीपासून आहे याचे उल्लेख मिळत नाहीत, कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्यदेवेता असल्याने पुढे भवानीदेवीचे पूजन रूढ होऊन तिला कुलदेवतेचा मान मिळाला असावा.

बाबाजी भोसले हे छत्रपतींच्या घराण्याचे मूळ राजकीय वारसदार महाराष्ट्रात स्थिर झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र मालोजीला श्रीतुळजाभवानीने दृष्टांत दिला तेव्हापासून ते ‘‘श्रीतुळजाभवानी हेच चित्तोडचे कुलदैवत मानिते झाले’’ अशा प्रकारचा उल्लेख चिटणीस बखरीत पाहण्यास मिळतो.

Leave a Comment

You cannot copy content of this page