शीतपित्त, अंगावर पित्त उठणे घरगुती उपाय

अंगावर शीतपित्त उठल्यावर अंगाला जास्त प्रमाणात खाज येते लालसर गाठी येतात बऱ्याचदा ओले कपडे घातल्याने, एखाद्या औषधाची एलर्जी असेल आणि नेमके तेच औषध घेतल्यास , पुरेशी झोप न घेतल्याने, जास्त खारट, मसालेदार आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ खाण्यात आल्यास, थंड अन्न पदार्थांचे सेवन केल्याने, एखाद्या गोष्टीची एलर्जी आल्याने असे होत असते.

अंगावर पित्त उठल्यावर अंगाला खाज येते, उलट्या होतात, ताप येतो, अशक्तपणा येतो म्हणूनच वेळीच यावर उपाय करणे गरजेच असत. आज आपण अंगावर पित्त उठल्यास कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात हे जाणून घेणार आहोत.

अंगावर पित्त उठल्यामुळे खाज येत असल्यास कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ करू शकता. असे केल्याने अंगाला येणारी खाज थांबून आपल्याला आराम मिळू शकतो.

कडूलिंबाची पाने मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट बनवून खाजेमुळे आलेल्या गाठींवर लावल्यास खाज थांबते आणि वेदना होणे देखील थांबते. शीतपित्तामुळे अंगाला येणारी खाज थांबवण्यासाठी आपण नारळाचे तेल खाज येणाऱ्या भागावर लावू शकता. नारळाचे तेल लावल्याने खाज येणे थांबायला मदत मिळते.

अंगावर पित्ताच्या गाठी आलेल्या असल्यास दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, आंबवलेले पदार्थ, मसालेदार, खारट, आंबट पदार्थ, मासे आणि इतर मांसाहारी पदार्थ, साखर, गोड पदार्थ खाणे टाळावे. आपल्याला शीतपित्त, अंगावर पित्त उठणे घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page