लांब आणि दाट केसांसाठी उपयोगी असणाऱ्या शिकेकाईचे जबरदस्त फायदे

चमकदार आणि निरोगी केस सर्वांनाच हवे असतात. केसांची योग्य रीतीने निगा घेतली नाही तर केस गळती मोठ्या प्रमाणात होते. हा त्रास अनेक महिलांना असतो. वेगवेगळी औषधे, शॅम्पू वापरूनही केसांची गळती थांबत नाही.

परंतु काही घरगुती उपचार केल्याने तुमची केस गळती थांबून घनदाट व सुंदर केस तुम्हाला दिसतील. घरगुती उपचार नैसर्गिक असल्याने त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. तुमचे केस गळणारही नाहीत आणि घनदाट होतील.

शिकेकाईमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे तुमचे केस अत्यंत चांगले राहतात. शिकेकाई पीएच मूल्य कमी करून केसांमधील नैसर्गिक तेल योग्य प्रमाणात राखून ठेवतं. यामुळे तुमच्या केसांना चमक येते.

विशेषतः शाळकरी मुलींच्या केसांमध्ये उवा होण्याचे प्रमाण जास्त असते. यासाठी शिककाईची पूड पाण्यात उकळून त्याने केस धुवा. यामुळे केसातील उवांचा नाश होतो आणि केसांची वाढ चांगली होते.

तुमच्या केसांना मजबुती आणायची असल्यास तुम्ही नियमित म्हणजे आठवड्यातून दोन वेळा तरी शिकेकाईचा वापर करा. त्यामुळे तुमच्या केसांना मजबूती येईल आणि शिककाई हे नैसर्गिक कंडिशनर म्हणून देखील काम करते. त्यामुळे तुमच्या केसांना नक्की याचा फायदा होईल.

खराब जीवनशैली आणि प्रदूषित वातावरणामुळे आपले केस कोरडे आणि निर्जीव होतात. केसांसाठी शिकेकाईचा वापर केल्याने केसांच्या मुळांना पुरेसे पोषण मिळते आणि केस चमकदार आणि सुंदर बनतात.

आवळा, शिकेकाई आणि रिठा यांचे मिश्रण एकत्र करून केसांना लावल्यास त्याचा देखील फायदा होतो. शिकेकाई 100 ग्रॅम, रिठा 20 ग्रॅम, बडीशोप 20 ग्रॅम, ज्येष्ठमध 20 ग्रॅम, मेथी 25 ग्रॅम हे सर्व घटक एकत्र दळून आणावेत. यातील दोन चमचे मिश्रण अर्धा लिटर पाण्यात उकळावे व या पाण्याने केस धुवा त्याने केसांसाठी फायदा होतो. केस लांब होतात.

प्रदूषणामुळे बहुतेकदा केसांची चमक जाते. त्याच्यासाठी शिकाकाईच्या शेंगाची पूड करून त्यांच्या पाण्याने केस धुण्याने केस वाढतात. बाजारामध्ये शिकेकाई शॅम्पू देखील उपलब्ध आहे, जो केसांसाठी वापरला फार उपयुक्त आहे.

केसाबरोबरच शिकेकाईचा वापर आपण मुतखड्याचा त्रास असल्यास एक चमचा शिकेकाई पावडर एक ग्लास पाण्यात उकळावी. त्यानंतर पाणी अर्धे आटल्यानंतर गाळून घ्यावे. रोज अर्धा कप शिकेकाईचे पाणी आठ दिवस प्यावयास घ्यावे.

आपल्याला केसांसाठी शिकेकाईचे फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page