शेवग्याच्या शेंगाची भाजी हि चवदार तर असतेच त्याबरोबरच शेवग्याच्या शेंगा खाल्याने अनेक आजारापासून आपले संरक्षण हि होते. काही ठिकाणी शेवग्याच्या पानाची हि भाजी आवर्जून केली जाते. शेवग्यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, पोटॅशिअम, प्रोटीन, आयरन, मॅग्नीशियम, व्हिटामिन-ए, व्हिटामिन सी आणि व्हिटामिन बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असते. आज आपण जाणून घेणार आहात शेवग्याच्या शेंगा खाल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे
जर आपल्याला पोटदुखी, अपचन किंवा गॅस, बद्धकोष्ठता यासारखे पोटाशी संबंधित आजार असतील तर आपण अशावेळी शेवग्याची भाजी खाल्ली तर त्यामुळे आपल्या पोटाशी संबंधित सगळ्या समस्या दूर होतील.
जर आपण किडनी स्टोन या आजाराने त्रस्त असाल तर आपण शेवग्याची भाजी खाल्ली पाहिजे किंवा शेवग्याच्या पानांचा सूप प्यायले पाहिजे यामुळे किडनी स्टोन लहान असेल तर लघवीवाटे पडून जातो.
शेवग्याच्या शेंगांची किंवा पानांची भाजी खाल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. शेवग्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, शेवग्याच्या शेंगांची किंवा पानांची भाजी खाल्याने हाडे मजबूत होतात. तसेच आपले दात हि मजबूत होतात.
लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास त्यांना शेवग्याच्या पानांचे सूप प्यायला दिल्याने पोटातील जंत निघून जातात. शेवग्याच्या शेंगांची किंवा पानांची भाजी खाल्याने कोलेस्ट्रॉल देखील कमी होते.
शेवग्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिन कमी असल्यास आपण शेवग्याच्या शेंगांचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. शेवग्याच्या शेंगांची किंवा पानांची भाजी खाल्याने आपल्याला आवश्यक असणारी पोषक तत्व मिळाल्याने केस गळणे हि कमी होते.
आपल्याला शेवग्याच्या शेंगा खाल्याने मिळणारे 10 आरोग्यदायी फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.