शरीरावर टाके पडलेले व्रण घालवण्यासाठी घरगुती उपाय

दुःखापत होऊन, जखम लागून बऱ्याच वेळा आपल्याला टाके पडतात. हे टाके काढल्यानंतर त्याचे निशाण तसेच राहते. चेहऱ्यासारख्या सर्वात महत्त्वाच्या अवयवावर जर टाके पडले असतील तर त्याचे डाग आपले सौंदर्य कमी करतात. त्यामुळे बऱ्याच जणांची ही एक मोठी समस्या बनली आहे.

टाके पडलेले व्रण घालवण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता. आज आपण हे घरगुती उपाय पाहणार आहोत. हळद आणि दूध यांचे मिश्रण एकत्र करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट टाके पडलेल्या निशाणीवर काही वेळेसाठी लावा. हळद आणि दुधामुळे टाक्याचे व्रण निघून जातील.

बदाम तेलामध्ये चमचाभर तीळ तेल मिसळा. मिश्रण चांगले मिसळल्यानंतर काही सेकंद तेल गरम करा. गरम झाल्यानंतर, मिश्रण टाकेच्या चिन्हावर लावा. यानंतर काही मिनिटे मसाज करा आणि कोरडे होऊ द्या.

दिवसातून दोनदा तरी असे करा. बदाम तेलात व्हिटॅमिन ई आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात जे त्वचेला पोषण देतात आणि त्वरीत त्यावर उपचार करतात. हे मिश्रण आलेले डाग काढून टाकते, त्वचा मऊ करते आणि रंग सुधारते.

त्वचेसाठी कोरफड वापरल्यास त्वचेची जळजळ कमी होते. तसेच जखम किंवा डागांचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. यासाठी आपण ताजे कोरफड वापरू शकता. आपल्याला ते त्वरित धुण्याची गरज नाही. दिवसातून 3 ते 4 वेळा कोरफडाच्या गराने मालिश करू शकता.

आवळयामध्ये व्हिटॅमिन सीची चे प्रमाण चांगले असते जे टाके आणि जखम इत्यादी कमी करण्यास मदत करते. आवळा वापरताना ऑलिव्ह ऑईल देखील वापरता येते.  तुम्ही आवळा पावडरमध्ये ऑलिव्ह तेल मिसळा आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाक्याची व्रण असलेल्या ठिकाणी लावा आणि 15 ते 20 मिनिटांनंतर स्वच्छ करा. आपण दररोज 1 वेळा ही पद्धत नियमितपणे वापरली पाहिजे.

आपल्याला शरीरावर टाके पडलेले व्रण घालवण्यासाठी घरगुती उपायहि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page