यूरिक ऍसिड हे आपल्या शरीरातील रक्तामध्ये आढळणारे रसायन आहे. जे आपल्या शरीरातील अनेक प्रक्रियांदरम्यान तयार होत असत, शरीरात तयार होणारे बहुतेक यूरिक ऍसिड रक्तात विरघळते आणि उर्वरित यूरिक ऍसिड आपल्या लघवी मधून बाहेर टाकले जाते.
आपल्या आहारात असणाऱ्या प्युरीनयुक्त पदार्थांच्या विघटनाने यूरिक एसिड तयार होत असत. सोप्या शब्दात आपण जे अन्न खातो त्याच्या विघटनाने यूरिक एसिड तयार होत असत. जर काही कारणामुळे शरीरात तयार होणार यूरिक एसिड लघवीद्वारे शरीराबाहेर पडले नाही.
अथवा प्युरीन घटक असणारे अन्न पदार्थ आपण जास्त प्रमाणात खाल्ले तर यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जसे कि आपले सांधे प्रचंड दुखू लागतील, एखाद्या जागी आपण बसले असाल तर आपल्याला जागेवरून उठणे सुद्धा अवघड होऊ शकत.
शरीरात युरीक एसिडचे प्रमाण वाढल्याने गाऊट नावाचा आजार होण्याची सुद्धा शक्यता असते, हाता पायाची बोट सुजल्यासारखी दिसू लागतील हे आणि अशा अनेक समस्या होऊ शकतात. आता आपण यूरिक ऍसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी काय काळजी घेऊ शकतो हे समजून घेऊयात.
ज्यांच्या शरीरात यूरिक ऍसिड वाढलय त्यांनी आपल्या आहारात प्युरीन असणारे पदार्थ न खाणे हा यावरचा सगळ्यात सोपा उपाय आहे. प्युरीन घटक असणाऱ्या काही पदार्थांची नाव आपण जाणून घेऊयात मांसाहार केल्याने आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात प्युरीन घटक जातात म्हणून शरीरात यूरिक ऍसिड वाढलेल असल्यास मांसाहार, मासे खाणे थांबवावं लागेल.
त्यानंतर ज्या पदार्थांमध्ये साखरेचा वापर जास्त प्रमाणात असतो असे पदार्थ खाणे सुद्धा थांबवाव लागेल, शाकाहारी लोकांनी आपल्या आहारात पालक, मटार, फ्लॉवर, राजमा आणि मशरूम अशा पदार्थांचा समावेश करू नका.
यूरिक ऍसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी आपल्या आहारात स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी यांचा समावेश करा. यांच्यामध्ये असणाऱ्या एंटी-इनफ्लैमटरी गुणधर्मामुळे यूरिक ऍसिडचे प्रमाण कमी व्हायला मदत मिळते.
यूरिक ऍसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी ह्या 2 गोष्टी नित्यनेमाने करा पहिली गोष्ट दिवसभरात शक्य तितके पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक लघवीमधून बाहेर टाकले जातील आणि दुसरी गोष्ट रात्रीचे जागरण करणे थांबवा, रात्री 6 ते 7 तास शांत झोप घ्या. ह्या दोन गोष्टी केल्याने आपल्या शरीरातील यूरिक ऍसिडचे प्रमाण नियंत्रणात राहील.
यूरिक ऍसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात जास्त प्रमाणात फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करा. जसे कि गाजर, मुळा, बीट, काकडी इत्यादी. आपल्याला यूरिक एसिड नियंत्रणात राहण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.