शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय

पोष्टिक आहाराच्या अभावामुळे, पुरुषांच्या तुलनेत महिलांना लोहाची जास्त गरज असते. बऱ्याचश्या महिलांच्या शरीरात लोहाची कमतरता आढळून येते. त्यामुळे त्यांना थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, केस गळणे, त्वचा निस्तेज पडणे, अशक्तपणा, अश्या समस्यांना सामोरे जावे लागते.

आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असल्यास चेहरा पिवळसर दिसतो, नखे, डोळे पिवळसर दिसू लागतात, एनिमिया हा आजार  होण्याचा धोका असतो.

याबरोबरच रक्ताची कमतरता असल्याने कोणत्याही कामात उत्साह वाटत नाही, रक्ताची कमतरता असणारे सुस्ती आल्यासारखे दिसतात. आज आपण शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी आपण दररोज अर्धा कप बीट ज्यूस प्या. अथवा जेवणासोबत बीट सलाड खा. बीटामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते.

रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी अजून एक सोपा उपाय म्हणजे रोज मुठभर शेंगदाणे आणि थोडसा गुळ खा. ज्यांना रक्त कमी असल्याने चक्कर येण्याची समस्या आहे त्यांना हा उपाय नक्की केला पाहिजे. गुळ शेंगदाण्यांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्त वाढायला मदत होते.

पेरू खाल्याने रक्ताची कमतरता दूर व्हायला मदत होते. काळे मनुके भिजवून खाल्याने आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर व्हायला मदत मिळते.

खजूर, बदाम, अक्रोड, काजू, अंजीर अश्या सुक्यामेव्याचे सेवन केल्याने देखील रक्ताची कमतरता दूर व्हायला मदत होते. रक्ताची कमतरता दूर होण्यासाठी आपण दररोज डाळींबाचा ज्यूस पिऊ शकता; अथवा डाळिंब खाऊ शकता.

हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो यांचा आहारात समावेश केल्याने देखील रक्ताची कमतरता दूर व्हायला मदत होते. ताज्या आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने त्यामध्ये असणाऱ्या विटामिन सी ह्या पोषक घटकामुळे रक्त वाढायला मदत मिळते. रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते.

दररोज सफरचंदाचे सेवन केल्याने आपल्या शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. आपल्या शरीरात रक्ताची कमतरता होऊ नये यासाठी रात्रीचे जागरण करू नका. दिवसभरात भरपूर पाणी प्या. नियमित शारीरिक व्यायाम करायची सवय स्वताला लावा.

आपल्याला शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपल्या मित्र मैत्रिणीपैकी ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांच्या पर्यंत हि महत्वपूर्ण माहिती पोहचवण्यासाठी आम्हाला मदत करा, त्यांना कमेंटमध्ये टॅग करा, पोस्ट शेयर करा. आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती सगळ्यात आधी वाचण्यासाठी आमचे फेसबुक लाईक/ फॉलो करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page