शरीरात प्लेटलेट्सची कमतरता असल्यावर दिसतात ही लक्षणे, प्लेटलेट्स वाढवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या शरीरातील रक्त पातळ असते; त्यामुळे जखम झाल्यावर ते त्यातून प्रवाहीत होते. वाहीत झालेलं रक्त थांबवण्याच काम प्लेटलेट करत असतात म्हणजेच रक्तस्राव अधिक प्रमाणात न होऊ देण्याचं काम प्लेटलेट करत असतात.

आपल्याला ताप आला कि शरीरातील प्लेटलेट्स कमी होण्याची शक्यता जास्त असते. ताप आल्यावर आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन ही कमी होते. बऱ्याचदा टायफॉइड हा आजार झाल्यानंतर शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होत असते.

निरोगी व्यक्तीच्या शरीरात साधारणपणे प्रति मायक्रोलिटर दीड लाख ते ते साडे चार लाख  प्लेटलेट्स असणे आवश्यक असते. जर आपल्या शरीरात या पेक्षा कमी प्लेटलेट्स असतील तर पुढील लक्षणे दिसून येतात.

शरीरात प्लेटलेट्सचे प्रमाण कमी झाल्यावर अशक्तपणा येतो, स्नायू दुखतात, थकल्यासारखे वाटते, नाकातून रक्त येत, लघवीचा रंग लालसर होतो, ताप येतो तसेच जखम झाल्यास रक्त प्रवाह थांबत नाही.

आता आपण शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात याविषयी जाणून घेऊयात. शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी सकाळी पपईचे सेवन आपण करू शकता.

पपईमध्ये विटामिन सी, विटामिन ए, विटामिन ई, एन्टीटऑक्सिडंट्स, प्रथिने असे पोषक घटक असतात; पपईचे सेवन केल्याने शरीरातील पांढऱ्या पेशी वाढायला मदत मिळते.

प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी आपण बीटाचे सेवन करू शकता; बीटामध्ये भरपूर प्रमाणात एन्टीऑक्सिडेंट असतात. बीटाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्सचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी रात्री झोपायच्या आधी 8-10 काळे मनुके भिजायला ठेवा सकाळी रिकाम्या पोटी ते चांगले चावून खा. असे केल्याने आपल्याला लवकर फरक जाणवेल.

प्लेटलेट्सची संख्या वाढण्यासाठी आपल्याला चांगला आहार आणि पुरेसा आराम करणे गरजेच असत. शिवाय दिवसभरात पुरेसे पाणी पिणे हि गरजेच असत.

आपल्याला शरीरात प्लेटलेट्सची कमतरता असल्यावर दिसतात ही लक्षणे, प्लेटलेट्स वाढवण्यासाठी घरगुती उपाय  हि माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page