वाढत्या कोलेस्ट्रॉलची समस्या हिवाळ्यात जास्त दिसून येते. कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो, कारण कोलेस्टेरॉल वाढले की रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठण्यास सुरुवात होते आणि जेव्हा ते खूप वाढते तेव्हा रक्तवाहिन्या ब्लॉक होतात
ज्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कोलेस्टेरॉल वाढले की शरीरावर अनेक प्रकारची लक्षणे दिसू लागतात. ती आज आपण जाणून घेणार आहोत.
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर पायऱ्या चढताना दम लागतो, अचानक वजन वाढायला लागते. एका जागेवर जास्त वेळ बसल्यास हात आणि पाय सुन्न पडतात, हात पायांना मुंग्या आल्या सारखे वाटते. थोडे काम केले तरी थकवा आल्यासारखे वाटते.
शरीरात कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे ही हाय बीपीची समस्या उद्भवते. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर अचानक पायांना सूज यायला लागते. शरीरात कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे दर काही दिवसांनी छातीजवळ दुखू लागले तर ते उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण असू शकते.
शरीरात कोलेस्ट्रोल वाढल्यावर प्रमाणापेक्षा जास्त घाम यायला लागतो. आपल्याला शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणकोणती लक्षणे दिसून येतात? हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.