शरीरात कोलेस्टेरॉल पातळी वाढल्यावर दिसून येतात हि 6 लक्षणे

आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल पातळी वाढल्यास त्यामुळे हृदयविकार, डायबेटीस, रक्तदाब कमी-जास्त होणे, प्यारालीसीस, किडनी खराब होणे, लिवर खराब होणे अशा समस्या होऊ शकतात. कोलेस्टेरॉल हा एक चरबीयुक्त पदार्थ असतो जो आपले लिवर तयार करत असते.

शरीरातील हार्मोन करण्यासाठी, सूर्यप्रकाशाचे व्हिटॅमिन डीमध्ये रूपांतर करण्यासाठी, शरीरातील विषारी द्रव्ये शोषून निरोगी ठेवण्यासाठी, आपल्या मेंदूसाठी चांगले कोलेस्ट्रोल गरजेच असत.

मात्र शरीरात एकूण कोलेस्टेरॉलची पातळी 200 mg/dl पेक्षा कमी असावे LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल 100 mg/dl पेक्षा कमी, HDL म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल 60 mg/dl पेक्षा जास्त आणि ट्रायग्लिसराइड 150 mg/dl पेक्षा कमी असणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. त्यापेक्षा जास्त असल्यास वेगवेगळे आजार होण्याचा धोका असतो.

आजकाल ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढताना दिसून येते. आज आपण शरीरात कोलेस्टेरॉल पातळी वाढल्यावर कोणकोणती लक्षणे दिसून येतात हे जाणून घेणार आहोत.

चांगले कोलेस्टेरॉल शरीराच्या आरोग्यास प्रोत्साहन देते तर खराब कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार होऊन अडथळे निर्माण होऊ शकतात. शरीरात कोलेस्टेरॉल पातळी वाढलेली असल्यास श्वास घ्यायला अडचण येते; दम लागतो. थोडे काम केले तरी जास्त प्रमाणात घाम येतो.

कोलेस्टेरॉल पातळी वाढलेली सतत पाय दुखत राहतात, हाता पायांना मुंग्या येतात. पायांमध्ये जडपणा येतो थोड चालल तरी थकवा येतो. कोलेस्टेरॉल पातळी वाढलेली वजन वाढलेलं असत, पोटाभोवती आणि शरीरावर चरबी जमा व्हायला लागते.

कोलेस्टेरॉल पातळी वाढल्याने शरीरातील रक्ताभिसरण क्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. शरीरात कोलेस्टेरॉल पातळी वाढलेली असल्यास छातीजवळ दुखू लागते.

वरती दिलेल्या लक्षणांपैकी एका पेक्षा जास्त लक्षणे आपल्याला जाणवत असल्यास आपण डॉक्टरांची भेट घेऊन आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य आहे की नाही हे तपासून घेऊ शकता.

आपल्याला शरीरात कोलेस्टेरॉल पातळी वाढल्यावर कोणकोणती लक्षणे दिसून येतात हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page