शरीर आतून डिटॉक्स करण्यासाठी 5 जबरदस्त घरगुती उपाय

दैनंदिन काम करण्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जेची गरज भासते. हि ऊर्जा आपल्याला मिळावी यासाठी आपण वेगवेगळे अन्नपदार्थ खात, पित असतो; आपण सेवन केलेल्या अन्नाचे पचन होऊन उरलेले घटक (टॉक्सिन्स) मल, मुत्र, घाम या रुपात शरीराच्या बाहेर टाकले जातात.

जर आपण मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ, मीठ, साखर, मैदायुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खात असाल तर आपल्या शरीरात अतिरिक्त टॉक्सिन्स जमा व्हायला लागतात.

जर वेळीच आपण हे टॉक्सिन्स आपल्या शरीराबाहेर काढले नाही तर त्यामुळे आपली त्वचा चांगली राहत नाही, चेहऱ्यावर पिंपल्स, डाग सुरकुत्या येऊ लागतात, किडनी, लिवर, आतड्यांना सूज येऊ शकते, पचनशक्ती कमजोर होऊ शकते. म्हणूनच आज आपण शरीराला डिटॉक्सिफाई करण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो हे जाणून घेणार आहोत.

शरीर आतून डिटॉक्स करण्यासाठी आठ दिवस सकाळी ग्लासभर कोमट पाण्यात 1 ½ चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून प्या. अपल सायडर व्हिनेगरमध्ये असलेल्या अम्लीय गुणधर्मामुळे शरीर आतून डिटॉक्स व्हायला मदत होते.

शरीराला डिटॉक्स करण्यासाठी संत्री, मोसंबी, अननस, सफरचंद, डाळिंब अशा फळांचा रस आपण पिवू शकता. हिरव्या पालेभाज्यांचा आपल्या आहारात समावेश करा. शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आपण ताकाचे सेवन करू शकता.

शरीराला डिटॉक्स करण्यासाठी फायबर घटक मोठ्या प्रमाणात असलेल्या गाजर, बीट, मुळा, काकडी अशा गोष्टींचा आहारात समावेश करू शकता. शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आपण लिंबू पाणी देखील पिवू शकता.

शरीराला डिटॉक्स करण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या. पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक लघवीद्वारे बाहेर काढले जातात. याच बरोबर पुरेशी झोप घेणे खूप गरजेच आहे. रोज कमीतकमी 30 मिनिटे शारीरिक परिश्रमाचा व्यायाम करा.

आपल्याला शरीर आतून डिटॉक्स करण्यासाठी 5 जबरदस्त घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page