महाराष्ट्रामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील असेच एक प्रसिद्ध गाव म्हणजे शिंगणापूर. या प्रसिद्धीचे मुख्य कारण म्हणजे येथे असलेले स्वयंभू शनैश्वराचे देवस्थान.
अहमदनगरपासून साधारणता 30 किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात हे गाव येते. शिर्डीपासून जवळ असलेले हे देवस्थान “जागृत क्षेत्र” म्हणून परिचित आहे.
एका आख्यायिकेनुसार शनी देव येथेच वास्तव्य करतात. शनीदेव हा अत्यंत कडक असल्याची लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या गावांमध्ये चोरी होत नाही.
या गावचे खास वैशिष्ट्य असे की, या गावातील सर्व घरांची, बँकांची द्वारे उघडी असतात. आश्चर्याची गोष्ट अशी की काही घरांना तर दरवाजेच नाहीत. हा एक मोठा चमत्कारच म्हणावा लागेल.
या देवस्थानातील शनिदेवाची मूर्ती पाच फुट नऊ इंच इतकी असून ती अखंड पाषाणात कोरलेली आहे. काही वर्षांपूर्वी ही शिळा वाहत आली आणि मूर्ती स्थापनेचा दृष्टांत दिला.
तेव्हापासून गावकरी या शिळेची पूजा करतात. या शिळेच्या बाजूला त्रिशूल, दक्षिणेस नंदी आणि समोरील बाजूस शिव आणि हनुमानाच्या प्रतिमा आहेत. या देवास मंदिर नाही.
शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो लोकांची गर्दी जमा होते. विशेषता अमावसेला अनेक भाविक दर्शनास येतात. हे एक जागृत देवस्थान असल्याने नियमित भाविकांची गर्दी दिसून येते. लोक या देवाला नवसही करतात.
या शीळेवर रोज तेलाचा अभिषेक करण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये शनी देवाची फारच दुर्मिळ मंदिरे पाहायला मिळतात. त्यातीलच हे एक जागृत देवस्थान.
आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.