रताळ्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. रताळ्यामध्ये लोह, फोलेट, तांबे, मॅग्नेशियम, विटामिन ए, विटामिन डी, विटामिन बी6 असे अनेक पोषक घटक असतात. आज आपण रताळे खाल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.
रताळे खाल्ल्याने एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. यामुळेच रताळे हे हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम अन्न मानले जाते.
रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतात. म्हणूनच रताळे खाल्ल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या रोजच्या आहारात उकडलेल्या रताळ्याचा समावेश करू शकता. रताळे खाणे हा वजन कमी करण्याचा रामबाण उपाय आहे.
रताळ्यामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. लोहाच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरात ऊर्जा नसते, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि रक्त पेशी देखील योग्यरित्या तयार होत नाहीत. रताळे लोहाची कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त असतात. रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन पुरेशा प्रमाणात आढळते, जे त्वचा आणि केसांसाठी खूप महत्वाचे असते.
रताळ्यामध्ये आढळणारे कॅरोटीनॉइड कर्करोगाचा धोका कमी करते. जांभळ्या रंगाच्या रताळ्यामध्ये अँथोसायनिन नावाचे संयुग आढळते आणि कलरेटर कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करते. रताळ्यामध्ये लोह, फोलेट, तांबे, मॅग्नेशियम असे पोषक घटक असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
रताळे खाल्ल्याने त्वचा उजळते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. रताळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेमध्ये कोलेजन तयार करते, ज्यामुळे आपली त्वचा चांगली राहायला मदत मिळते.
रताळे हा व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. रताळ्याचे सेवन केल्याने दात, हाडे, त्वचा आणि मज्जातंतूंच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी आवश्यक असणारे पोषक घटक मिळतात. रताळे हे व्हिटॅमिन ए चा खूप चांगला स्त्रोत आहे.
रताळे हा पोटॅशियमचा खूप चांगला स्रोत आहेत. हे पोषक घटक मज्जासंस्थेचे योग्य कार्य राखणे आवश्यक असतात. आपल्याला रताळे खाल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.