“सायटिका” मांड्यांचा मागचा भाग व पोटऱ्यांमध्ये वेदना घरगुती उपाय

वयाच्या तिशीनंतर कामाच्या व्यापामुळे, पुरेसा पोषक आहार न घेतल्याने, शारीरक व्यायामाच्या अभावामुळे हळू हळू आपल्या शरीरात बदल व्हायला लागतात. जसे कि आहारात कॅल्शियमची कमतरता असल्यास सांधेदुखी होते, व्हिटामिन ए च्या कमतरतेमुळे नजर कमजोर होते, व्हिटामिन सी च्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते.

अगदी असाच एक बदल आपण जड, परिश्रमाच  काम करत असाल तर आपल्या शरीरात होत असतो. जड, परिश्रमाच काम केल्याने आपल्या हाडांची झीज होत असते, आपल्या शरीरात असणाऱ्या नसा कमजोर होत असतात. आज आपण अशाच एका महत्वाच्या विषयावर अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

आजकाल आपण बघतोय बऱ्याच जणांच्या मांड्यांचा मागचा भाग आणि पोटऱ्यांमध्ये वेदना होण्याची समस्या वाढत चालली आहे. ह्या आजाराला सायटिका असे म्हणतात. ह्या आजारामध्ये पायाच्या मागच्या भागात वेदना होतात तसेच पाय जड झाल्यासारखं वाटत, एका जागेवर बसल्यानंतर उठताना पायात तीव्र वेदना व्हायला लागतात.

सायटिकाच्या तीव्र वेदना कमी करण्यासाठी एक सोपा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्याला पारिजातक ह्या औषधी वनस्पतीची 250 ग्राम पाने लागतील. हि पाने आणल्यानंतर स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर हातानेच ह्या पानांचे तुकडे करून पातेल्यात ठेवा त्यामध्ये एक लिटर प्यायचे पाणी मिसळून गॅसवर उकलण्यासाठी ठेवा.

पातेल्यातील पाणी अर्ध्या पेक्षा जास्त झाल्यावर गॅस बंद करून तयार झालेला काढा गाळून घ्या. हा काढा साधारणपणे अर्धा ग्लास ह्या प्रमाणात दिवसातून 3 वेळा 15 दिवस घ्यायचा आहे. हा काढा घेतल्याने बऱ्याच जणांना फायदा झाला आहे.

यासोबतच पायाचे स्नायू मजबूत होण्यासाठी सायकल चालवणे, सकाळी कमीत कमी 30 मिनिटे चालणे, भुजंगासन, वायुमुद्रा, मकरासन हि योगासन करणे गरजेच आहे. जर आपण उंच टाचा असलेल्या चपला वापरत असाल तर आपण त्वरित थांबवलं पाहिजे.  जर आपण बसून काम करत असाल तर कंबरेला आधार मिळेल अशा प्रकारे बसून मग काम करा.

अवजड वजन उचलताना इतरांची मदत घ्या. वेदना कमी करण्यासाठी आपण गरम पाण्यात सैंधव मीठ टाकून त्या पाण्यात पाय बुडवून 10 मिनिटे बसू शकता. रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात थोडीशी चिमुटभर हळद पावडर मिसळून ते दुध प्या आपल्याला नियमित असे केल्याने हळू हळू काही दिवसांनी वेदना कमी होतील.

ह्या प्राथमिक उपायांनी आपल्या वेदना जर कमी होत नसतील तर आपण डॉक्टरांशी संपर्क साधा.आपल्याला “सायटिका” मांड्यांचा मागचा भाग व पोटऱ्यांमध्ये वेदना घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा.

माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page