“सायनस” अर्थात नाकाचं हाड, गाल आणि डोळयांच्या आजूबाजूला दुखत असल्यास घरगुती उपाय

वातावरणातील बदल त्यासोबत वाढणार प्रदुषण यामुळे सायनसचा त्रास बऱ्याच जणांना होत असतो या आजारामध्ये नाकाचं हाड, गाल आणि डोळयांच्या आजूबाजूला आणि डोळे हि दुखू लागतात. आज आपण सायनस आजाराबद्दल अधिक माहिती घेणार आहोत तसेच हा आजार झाल्यावर आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकता हे हि जाणून घेणार आहोत.

बऱ्याच जणांना सायनसचा त्रास हा कामावरून घरी आल्यानंतर होतो त्यामुळे घरी आल्यानंतर सर्वप्रथम आपल्या नाकात आणि गळ्यामध्ये जमलेली धूळ आणि मातीचे कण साफ होण्यासाठी निलगिरी तेलाचे काही थेंब टाकून गरम पाण्याची वाफ घ्या.

सायनसचा त्रास कमी होण्यासाठी लसणाच्या एक ते दोन पाकळ्या चावून थोडा वेळ चघळा. सायनसचा त्रास कमी करण्यासाठी पुदिना तेलाचे काही थेंब गरम पाण्यात टाकून त्या पाण्याने वाफ घ्या.

सायनस ह्या आजारापासून आराम मिळवण्यासाठी आपण दिवसभरात गरम पाणी, फळांचे ज्यूस, नारळ पाणी अशा गोष्टींचे सेवन करू शकता. तसेच सायनसचा त्रास होत असल्यास थंड पाणी, थंड पेय पिणे टाळा. झोपण्याआधी कोमट पाणी प्या. धूळ, धूर यापासून संरक्षण होईल असे मास्क वापरा.

आपल्याला सायनस आजार घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page