सौमित्रची भुमिका साकारलेल्या अद्वैत दादरकरची पत्नी आहे एक उत्कृष्ट अभिनेत्री…

सौमित्र हे नाव जरी आता महाराष्ट्रातील तमाम जनतेपुढे उचलून ठेवलं तरी ते सांगतील “माझ्या नवर्याूची बायको” मधला अभिनेता ना तो, होय म्हणजेचं “अद्वैत दादरकर”. झी’मराठी या चॅलेनवरील प्रचंड गाजलेल्या मालिकेतील एक महत्वाची भुमिका अद्वैतने पार पाडली अर्थातच त्या मालिकेत तो, सध्या राधिकाचा पती झालेला आहे.

खऱ्या आयुष्यातला सौमित्र थोडक्यात “अद्वैत” हा विवाहीतच आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे, आजवर अद्वैतने ज्या भुमिका साकारल्या काही काळ चला हवा येऊ द्या व्हायरलं या पर्वाचाही तो भाग राहिला एक विनोदी कलाकार म्हणून तर त्याला प्रेक्षकांची या सर्वांमधून फार पसंती मिळालीच. खऱ्या आयुष्यातली अद्वैतची पत्नी हेदेखील एक अभिनेत्री आहे.

नुकत्याच काही कालावधीपुर्वी पार पडलेल्या “अळी मिळी गुपचिळी” या कार्यक्रमाला त्याने सहकुटुंब हजेरी लावली होती. अद्वैतने मराठी रंगभूमीदेखील नाटकांच्या माध्यमातून गाजवली आहे.

“भक्ती देसाई” ही अद्वैतची पत्नी तीदेखील भुमिका साकारते, तिने साकारलेल्या  “तू म्हणशीलं तसं” या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या नाटकातही काम केलं होतं.

“प्रसाद ओक” यांच दिग्दर्शन आणि प्रशांत दामले यांची निर्मिती असलेल्या या नाटकावरून “भक्तीचं” सर्वच स्तरात कौतुक झालं होतं. भक्तीने कधी कामाच्या भुमिका ठराविक ठेवल्या असं झालं नाही. तिने मालिकातही काम केलं. झी मराठीची गाजलेली मालिका “अरूंधती” यातही भक्तीने उत्तमरित्या तिचं कार्य वठवलं.

अद्वैत व भक्ती दोघांना एक मुलगी आहे. सोशल मिडीयावर अद्वैतकडून अनेकदा कुटुंबियांचे फोटोज पोस्ट होतं असल्याचं पहायला मिळतचं. मुलीचं नाव मीरा असून तिचे गोंडस फोटोज अद्वैतच्या इन्स्टा अकाऊंटवर तुम्ही पाहू शकता.

अद्वैत व भक्ती अर्थात काॅलेज जीवणापासून एकमेकांना योग्यरित्या ओळखतात. भक्ती नाटकात काम करायची तर अद्वैत त्या काळात नाटकांच दिग्दर्शन करायचा. नंतर ओळख होऊन दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर काही वर्षातच दोघांचं लग्नदेखील पार पडलं.

भक्तीने गेलेला लॉकडाऊनचा कालावधी घरच्यांच्या सहवासात अगदी आनंदात गेल्याचंही सांगितलं आहे. भक्तीच नाटक रंगभूमीवरील प्रेम आता सर्वांना ज्ञात झालचं आहे.

bhakti ani adwait dadarkar

मुळात कॉलेजच्या दिवसांमधे तिने “बाजीराव मस्तानी” या नाटकातही भुमिका केली आहे. यातुन मिळवलेल्या अनुभवाद्वारे भक्तीने पुढे चालून ऑडिशन  दिल्या आणि “झेप” व त्याचसोबत “कशाला उद्याची बात” या मालिकांमधेदेखील काम केलं. या दोन मालिकांमधील भुमिका वठवून झाल्यानंतर भक्तीला पुन्हा थिएटर अर्थात नाटकाची संधी चालून आली व तिने नाटकातही भुमिका साकारली.

प्रेमळ कुटुंबात वाढलेल्या भक्तीला पुढे चालून दिग्दर्शन करणारा व अभिनयातही रस असणारा अद्वैत पती म्हणून मिळाला. लॉकडाऊनच्या आठवणी सांगताना, डॉक्टरांच्या कामाबद्दल भक्तिने तिच्या एका रोहिणी नावाच्या महिला डॉक्टराच्या भुमिकेवरून काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या.

ती म्हणाली, डॉक्टरांच काम फार मेहनतीचं आणि जिकारिचंही आहे; तिथे कुठलीच सुट्टी अथवा आराम करायची मुभा फारशी नसते. जितकी पेशंटची संख्या त्यांची परिस्थिती गंभिर तितकिच जास्त मेहनत डॉक्ट रांना घ्यावी लागते. त्यामुळे आपण सदैवचं त्यांचे ऋणी राहिले पाहिजे. भक्तीला काही गोष्टींची जाणीव स्वत:साठीही महत्वाची वाटते.

तिच्या म्हणण्याप्रमाणे, बिग बॉस अथवा इतर शो मधे भाग घेऊन तिथे तो वेळ घालवण्यापेक्षा तिने स्वत: कुटुंबाला वेळ देणं तिला जास्त आवडतं.

भक्ती एक रंगभूमीवरील हुन्नरी कलाकार नक्कीच आहे असं म्हणता येईल. तिच्या आयुष्यात अजून पुढेही पुष्कळ भुमिका येत राहतील. भविष्यात तिला एक रंगभूमीवरील अतिउत्कृष्ट नायिका म्हणूनही पाहता यावं; हीच चाहत्यांची ईच्छा असेल.

Leave a Comment

You cannot copy content of this page