संपूर्ण भारतात श्री गणेशाची सर्वत्र पूजा केली जाते. गणपतीला बुद्धीची देवता म्हणून पुजले जाते. भारतात गणपतीच्या वेगवेगळ्या रूपातील मोठं मोठ्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात.
मात्र श्री गणेशाची भारतातील सर्वात उंच मूर्ती कुठे आहे हे आपल्याला माहित नसेल तर काळजी करू नका आज आपण त्याचविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला आश्चर्य वाटेल श्री गणेशाची भारतातील सर्वात उंच मूर्ती महाराष्ट्रातील कोल्हापुर जिल्ह्यामधील संभापूर या ठिकाणी आहे.
पर्यटकांना आकर्षित करणारी ही भव्य मूर्ती चिन्मय गणाधीश म्हणून ओळखली जाते. श्री गणेशाची ही मूर्ती ८५ फूट उंच आहे. तसेच या मूर्तीचे वजन ८०० टन इतके आहे. कर्नाटकातील ५० कारागिरांच्या मदतीने या मूर्तीची उभारणी करण्यात आली आहे. ही गणेश मूर्ती बांधण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागला.
जनसामान्यांच्या देणगीतून या मूर्तीची उभारणी करण्यात आली आहे. मुख्य मूर्तीच्या बाजूला चिन्मय महाराजांचे आश्रम आहे. याठिकाणी करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाद्वारे या मूर्तीच्या बांधकामाचा संपूर्ण इतिहास पाहायला मिळेल. तसेच येथे स्वामी चिन्मयानंद महाराजांच्या संपूर्ण जीवनपटाचे दर्शन होते.
ही गणेश मूर्ती डाव्या सोंडेची आहे. उजवा पुढचा हात वरद मुद्रेत आहे. तर मागील हातात अंकुश आहे. डाव्या हातात पाश आणि मोदक आहे. मुकुट धारण केलेल्या गणेशावर नागांनी छत्र धरले आहे.
विविध अलंकारांनी गणपतीला सजवण्यात आले आहे. त्यामुळे ही मूर्ती पाहताक्षणी भक्तांच्या मनात भरते. कोल्हापूर पासून १५ किलोमीटर अनंतराव असणाऱ्या टोप संभापूर या गावात हे ठिकाण आहे. या गणेशाच्या दर्शनासाठी अनेक भक्त नित्य गर्दी करतात.
आम्हाला आशा आहे कि आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून नक्की सांगाल. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे अवश्य सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.