सरसेनपती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या महाराणी ताराराणी यांचा थोडक्यात इतिहास

महाराणी ताराराणी यांचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला ताराराणी कोण होत्या हे सर्वप्रथम समजून घ्यावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांचे धाकले पुत्र छत्रपती राजाराम महाराज त्यांचा पहिला विवाह सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या कन्या जानकीबाई यांच्यासोबत झाला होता.

मात्र जानकीबाई यांचे अकाली निधन झाल्याने छत्रपतीराजाराम महाराजांचा विवाह सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या राणी ताराबाई यांच्याशी झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी राजाराम महाराज यांच्यावर आली.

पुढे मोगलांशी संघर्ष चालू असताना प्रकृती खालावल्याने छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू सिंहगड किल्ल्यावर झाल्यानंतर स्वराज्याचा सांभाळ कोण करेल? असा प्रश्न उपस्थित झाला. अशावेळी न डगमगता, न खचता मराठा साम्राज्याचा झेंडा महाराणी ताराबाईंनी आपल्या हाती घेतला.

ताराबाईंना लहानपणापासून लाठीकाठी, तलवारबाजी आणि राजकीय युद्धनीती अशा गोष्टींचे शिक्षण आपल्या वडलांकडून म्हणजेच हंबीररावांकडून मिळालेल असल्यामुळे अवघ्या पंचवीस वर्षाच्या ताराराणीने औरंगजेबाच्या हातून एक एक किल्ला हस्तगत करण्यास सुरुवात केली.

महाराणी ताराराणी यांनी पन्हाळा हा किल्ला जिंकून पुत्र शिवाजी (दुसरे) यांचा राज्याभिषेक करून त्यांना गादीवर बसवले. त्यानंतर  सिंहगड, राजगड, सातारा, वसंतगड असेमहत्वाचे किल्ले मोघलांकडून जिंकून घेतले.

आपल्याला महाराणी ताराराणी यांचा थोडक्यात इतिहास हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page