हिंदू व मुस्लिम यांच्यातील वाढत्या दुराव्याची परिणीती मुसलमानांकडून वेगळ्या राष्ट्राची मागणी करण्यात झाली अन ही मागणी आता जोर पकडू लागली. मुस्लिम लीग च्या स्थापने नंतर आपल्या वेगळ्या राजकिय अस्तित्वाची जाणीव होऊ लागली.
आपला धर्म व आपली संस्कृती वेगळी आहे हा विचार पद्धतशीरपणे बिंबवला याच समर्थन करत असतानाच जर आपला धर्म व संस्कृती वेगळी आहे तर आपले राष्ट्र ही वेगळं का असू नये. १९३०मध्ये मुस्लिम लीगच्या अलाहाबाद येथील अधिवेशनात सर महंमद इकबाल यांनी पाकिस्तान ची कल्पना सर्वप्रथम मांडली.
अर्थात त्यावेळी त्यांना मुसलमानांचे स्वतंत्र राष्ट्र अभिप्रेत नव्हते. भारतातील मुसलमानांचे एक वेगळे राज्य निर्माण करण्यात यावे अशी त्यांची सूचना नव्हती.
वेगळ्या राष्ट्राची खऱ्या अर्थाने पाकिस्तान ची मागणी प्रथम रहमत अली चौधरी यांनी १९३३ मध्ये केली खरी पण त्या वेळी मात्र त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. राष्ट्रवादी विचारांचे नेते म्हणून भारतीय राजकारणात पदार्पण केले होते. त्यांची सुरुवातीच्या काळातील राष्ट्रवादी असलेले बॅरिस्टर जिना संप्रदायिकतेकडे झुकत गेले.
साधारणपणे १९३७ नंतर पाकिस्तानची मागणी चा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू लागला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील वादामुळे पाकिस्तान च्या मागणीचा जोर अधिकच वाढू लागला.
त्यावेळी प्रांतिक कायदेमंडळासाठी झालेल्या निवडणुकांनंतर काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांचे मतभेद वाढू लागले. या निवडणुकीनंतर मात्र जिना आता पाकिस्तान च्या मागणीचा उघडपणे पुरस्कार करू लागले. १९४०मध्ये मुस्लिम लीगचे अधिवेशन लाहोर येथील अधिवेशनात पाकिस्तान च्या मागणीचा ठराव संमत केला.
मार्च १९४२ सालच्या क्रिप्स योजनेच्या वेळी या पाकिस्तान च्या मागणीचा जोर जास्त च वाढू लागला. पुढे ऑगस्ट १९४२मध्ये काँग्रेसने इंग्रजी सत्तेविरुद्ध “चले जाव” आंदोलन सुरू केले. परंतु जिना समर्थकांनी या आंदोलनाला विरोध करून सरकार ला उघडपणे पाठींबा दिला.
याचा फायदा इंग्रजांनी घेतला. जोपर्यंत मुस्लिम लीग अन काँग्रेस चा वाद जोपर्यंत मिटत नाही तोवर भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न मार्गी लागू शकत नाही. त्यामुळे जिना यांनी अधिकच ताठर भूमिका घेतली. महात्मा गांधी यांची काँग्रेस ला सहकार्याची मागणी देखील लीग ने फेटाळून लावली.
१९४६ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या हंगामी सरकारमध्ये सामील होण्यासही मुस्लिम लीग ने नकार दिला. इथं पर्यंत चा काळ जर कोणताही पूर्वग्रह न ठेवता जर पाहिला तर असं दिसून येते की, काँग्रेसने देशाचे विभाजन टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले होते पण बघायला गेलं तर नेहरूंची पंतप्रधान होण्याचा हव्यास होता. परंतु जिनांच्या आडमुठेपणा मुळे हा वाद अधिकच चिघळत गेला. पाकिस्तान ची मागणी अधिक रेटण्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या प्रत्येक गोष्टीत विरोध दर्शवत होते.
मुस्लिम लीग ने पाकिस्तान च्या मागणीसाठी १६ ऑगस्ट १९४६ हा प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे आदेश दिले. यामुळे देशात भयंकर दंगली उसळल्या त्यात अनेक निरपराध माणसे प्राणास मुकली.
देशांत अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली. अशा वातावरणात देशाचे ऐक्य टिकवण्यासाठी नाईलाजाने देशाच्या फळणीस मान्यता दिली. १४ ऑगस्ट १९४७ रोजी देशाच्या फाळणीतून पाकिस्तानची झालेली निर्मिती हे सांप्रदायिक विचारसरणीला आलेला रक्तरंजित डाग होता.