सर्दीमुळे नाक बंद असल्यास आपली संपूर्ण दिनचर्या खराब होते. सर्दी झाल्यावर आपली झोप देखील पूर्ण होऊ शकत नाही. कधीकधी बंद नाक आपल्यासाठी मोठी समस्या बनते. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत सर्दीमुळे बंद झालेले नाक उघडण्यासाठी घरगुती उपाय.
वाफेद्वारे बंद नाकावर इलाज करण्यासाठी भांड्यात गरम पाणी घ्या आणि मग भांड्याच्या वरच्या बाजूस टॉवेलच्या मदतीने आपले तोंड झाकून घ्या. थोडावेळ वाफ घ्या. असे केल्याने बंद नाक अल्पावधीतच उघडेल.
2 चमचे मध नियमितपणे घेतल्यास सर्दी कमी होऊन आराम मिळतो. चांगल्या परिणामासाठी आपण गरम पाण्यात 2-3 चमचे मध मिसळून प्राशन करू शकता. 2 चमचे लिंबाचा रस, 1/4 चमचे मिरपूड आणि एक चिमूटभर मीठ एकत्र करून मिश्रण तयार करा. बंद नाक उघडण्यासही लिंबू खूप प्रभावी आहे.
यासाठी सुमारे दोन चमचे लिंबाचा रस अर्धा चमचा मिरपूड पावडर आणि एक चिमूटभर मीठ मिसळा आणि आपल्या नाकात टाका. बंद नाकापासून तुम्हाला आराम मिळेल. सर्दीमुळे बंद झालेले नाक उघडण्यासाठी तुळशीची पाने देखील वापरु शकता. यासाठी सकाळी आणि रात्रीच्या जेवणा नंतर ताजी तुळशीची पाने खा. याचा तुम्हाला खूप फायदा होईल.
मोहरीच्या तेलामध्ये अँटीवायरल गुणधर्म असतात जे बंद नाकाच्या समस्येपासून त्वरित आराम प्रदान करते. आपल्याला सर्दीमुळे बंद झालेले नाक उघडण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.