नमस्कार, स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी रोज नवनवीन आणि आरोग्यपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा. दालचिनीचा वापर भाज्यांना चव येण्यासाठी, चहामध्ये, आमटीमध्ये केला जातो.
दालचिनीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. आज आपण सर्दी, खोकला, घसादुखी, कफ झाल्यावर दालचिनीचा वापर कसा करायचा हे जाणून घेणार आहोत.
घश्यात खवखव होत असल्यास अर्धा चमचा दालचिनी पावडर कपभर पाण्यात टाकून उकळून घ्या; उकळल्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर मिसळा पाणी कोमट झाल्यावर ते पाणी प्या. हा उपाय दिवसातून दोन वेळा केला तर घसादुखी, घश्यात होणारी खवखव थांबते.
हा काढा सर्दी, खोकला आणि कफ ह्या आजारांवर देखील प्रभावी आहे. खोकला येत असल्यास काढ्यामध्ये साखरेऐवजी थोडसे मध मिसळा.
दालचिनीचा काढा सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित व्हायला मदत मिळते. आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी, कोलेस्ट्रोल कमी होते.
ज्या स्त्रियांना मासिकपाळीच्या दरम्यान अंगदुखी, कंबरदुखीचा त्रास होतो त्यांनी एक कप दालचिनीचे पाणी मासिकपाळी येण्याच्या आधी 3 दिवस प्या असे केल्याने मासिकपाळी दरम्यान होणारा त्रास कमी व्हायला मदत मिळते.
दालचिनी पाणी बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे यासाठी रात्री दालचिनीचे लहान लहान तुकडे करून पाण्यात भिजायला घाला सकाळी हे पाणी गाळून प्या.
सकाळी रिकाम्यापोटी दालचिनी पाणी प्यायल्याने पचनसंस्था मजबूत होते. वजन कमी व्हायला मदत मिळते. आपल्या शरीरातील हार्मोन्स संतुलित होतात. रोगप्रतिकार शक्ती वाढते.
दालचीनी हा उष्ण गुणधर्म असणारा मसाल्याचा पदार्थ असल्याने दालचिनीचे सेवन हे थोड्या कालावधीसाठी आणि कमी प्रमाणातच करणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे.
आपल्याला सर्दी, खोकला, घसादुखी पासून आराम मिळण्यासाठी दालचिनीचा वापर कसा करावा हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.