हिवाळ्यात सर्दी, खोकला, घसादुखी, छातीत कफ झाल्यास करा हे घरगुती उपाय

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने वातावरणात बदल झाल्यावर, प्रवास केल्यावर जर आपल्याला सर्दी, खोकला, घसा खवखवणे, घसादुखी असे आजार होत असतील तर हि माहिती तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही आपल्याला असे घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने आपण स्वताला निरोगी ठेवू शकाल.

हिवाळ्यात सर्दी, खोकला, घसादुखी, छातीत कफ होऊ नये यासाठी आपण रात्री झोपण्याच्या अर्धातास आधी एक ग्लासभर कोमट दुधात थोडीशी हळद टाकून ते दुध प्या. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल.

घसादुखी, छातीत कफ झाला असल्यास आपण कोमट पाण्यात थोडेसे जाडे मीठ टाकून त्या पाण्याने दिवसातून 3 ते 4 वेळा खळखळून गुळण्या करा. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने आपला घसा लवकर मोकळा होईल. तसेच छातीत जमा झालेला कफ बाहेर पडेल.

हिवाळ्यात सर्दी, खोकला, घसादुखी, छातीत कफ होऊ नये यासाठी कोऱ्या चहामध्ये थोडेसे आले, तुळशीची पाने, दालचिनीचा छोटा तुकडा एखादी लवंग घालून तो चहा दिवसातून दोन वेळा प्या. असे केल्याने आपल्याला लवकर आराम मिळेल.

खोकला कमी होण्यासाठी आपण मधामध्ये बुडवलेली लवंग चघळू शकता. सर्दी कमी होण्यासाठी दिवसातून दोन वेळा गरम पाण्याची वाफ घ्या.

आपल्याला हिवाळ्यात सर्दी, खोकला, घसादुखी, छातीत कफ होऊ नये यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page