सप्तशृंगी देवी मंदिराविषयी माहिती

भारतामध्ये एकूण १०८ शक्तीपीठ असल्याचा भागवत कथेत उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यापैकी साडेतीन शक्तीपीठ महाराष्ट्रामध्ये आहेत. आज आपण अश्याच एका शक्तीपीठाबद्दल जाणून घेणार आहोत. सप्तशृंगी देवी हे अर्धशक्तिपीठ नाशिकपासून ६५ किमी अंतरावर ४८०० फूट उंच सप्तशृंग पर्वतावर विराजमान आहे.

मुख्य मंदिरात जाण्यासाठी साधारणपणे ५०० च्या आसपास पायऱ्या चढाव्या लागतात. देवीचे मंदिर गुहेच्या जवळ असून गाभाऱ्याला शक्तीद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत.

या तीन दरवाजातून देवीची मूर्ती दिसते. मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला देवीची आठ फुट उंच धीर गंभीर आणि प्रसन्न मुद्रेतील अठरा हाती मूर्ती दिसते.

देवीच्या डोक्या वर सोन्याचा मुकुट, कानामध्ये कर्णफुले, नाकात नथ तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे, असे विविध अलंकार देवीच्या अंगावर घातलेले आपल्याला दिसतात. मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्या मनाला प्रसन्न वाटते.

एका आख्यायिकेनुसार, महिषा’सुराच्या नाशासाठी सर्व देवी-देवतांनी मातेची पूजा केली, त्यानंतर देवी सप्तशृंगीच्या रूपात प्रकट झाली आणि या ठिकाणी तिने युद्ध करताना महिषा’सुराचा व’ध केल्याचे सांगितले जाते. बखरींमध्ये नोंदवलेल्या संदर्भानुसार सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आले होते.

येथे येणाऱ्या देवीच्या भक्तांना पुरणपोळीचा प्रसाद दिला जातो. सप्तशृंगी देवी मंदिराला भेट देण्यासाठी आपण जाणार असाल तर जाण्यासाठी बस,गाड्या नाशिक बस स्थानक येथून मिळतात.

सप्तश्रुंग गडावर देवी भक्तांच्या निवासाची सोय धर्मशाळेमध्ये होऊ शकते. आपल्याला हि माहिती कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा. अशीच माहिती वाचण्यासाठी शोध इतिहाचा हे फेसबुक पेज लाईक करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page