आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव यासाठी आम्ही रोज नवनवीन आणि आरोग्यपूर्ण माहिती घेऊन देत असतो. ती माहिती आपल्यापर्यंत नियमित पोहोचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक/फॉलो करा.
आज आपण संत्र्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आंबट गोड संत्रे खायला आवडत. संत्रे पचायला हलके असते. संत्र्यामध्ये फायबर घटक मोठ्या प्रमाणात असतात.
संत्र्यामध्ये एन्टी ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, असे पोषकतत्व असतात. सकाळच्या वेळी एक ग्लास संत्र्याचे ज्यूस प्यायल्याने शरीरातील हानिकारक घटक शरीरातून काढून टाकले जातात.
संत्र्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रोल पातळी कमी व्हायला मदत मिळते. नियमित संत्र्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील रक्तशुद्धीकरण व्हायला मदत मिळते. उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी आपण संत्र्याचे सेवन करू शकता.
ज्यांना बद्धकोष्टतेचा त्रास आहे त्यांनी संत्र्याचे सेवन अवश्य केले पाहिजे. संत्र्याचे सेवन केल्याने त्यामध्ये असणाऱ्या फायबर घटकांमुळे आपले पोट चांगल्याप्रकारे साफ होते.
संत्र्यामध्ये झिंक, लोह आणि अनेक महत्वाची खनिजे असतात. संत्र्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत व्हायला मदत मिळते. नियमित संत्री खाल्ल्याने किडनीला फायदा होतो; तसेच ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांनी संत्र्याचे सेवन केल्याने किडनी स्टोनची वाढ थांबते. लहान लहान किडनीस्टोन लघवीवाटे पडून जातात.
मुळव्याध हा आजार असलेल्यांनी संत्र्याचे सेवन केल्याने होणारा त्रास कमी होतो. संत्र्याच्या सालीच्या पावडरने स्क्रब केल्याने चेहऱ्याचा रंग उजळतो; चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
आपल्याला संत्र्याचे सेवन केल्याने मिळणारे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. माहिती आवडल्यास पोस्ट शेयर करा. पोस्टच्या कमेंटमध्ये आपल्या मित्र- मैत्रिणीना टॅग करा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे