संताजी व धनाजी यांना पाहून मोगल सैनिक काय तर घोडेही घाबरत.

छत्रपती संभाजी महाराजांचे क्रूर हत्ये नंतर १६८९ स्वराज्याला सुरुंग लावण्यासाठी औरंगजेब तयारच होता. औरंग्याने खिळखिळे केलेलं स्वराज्य आता हळूहळू पुन्हा तग धरु पाहत होते. स्वराज्य मे १६९० पर्यंत राजगडापासून पन्हाळ्यापर्यंत पुन्हा जोर धरु लागले होते, आणि यासाठी संताजी-धनाजी या जोड़गोळीने आपले सर्वस्व पणाला लावले होते.

या जोडीने सातारच्या लढाईत सर्जाखान, रायबाग हुक्केरीचा लढाईत जाननिस्सारखान, तहव्वुरखान, कांजीवरम च लढाईत अलीमर्दनी खान, जिंजी च लढाईत झुल्फिकार खान, दोड्डेरी च लढाईत खानजादा खान आणि कासिम खान, बसवपटणं च लढाईत हमिनिदुईन खान, हिम्मत खान, सफशिखन खान, रुस्तम खान, खटाव सातारा जवळ, लुत्फुल्लाखान, कोल्हापूर जवळ मुकर्रखान खान आणि इनायत खान यांसारख्या कितीतरी बलाढ्य सेनापतींचा पराभव करुन आपली घोडी संताजी आणि धनाजी चौफेर उधळत होता.

खानदेशापासून जिंजीपर्यंतचे विस्तृत मैदानी युद्धक्षेत्र या दोघांच्या पराक्रमा ने गाजले होते आणि त्याचा दहशतीचा पुरेपूर वापर संताजी धनाजी यांनी केला. धनाजी जाधव यांनी गुजरात पार करून भरूच वैगेरे इथे मुघल वर विजय मिळवला.

नर्मदा क्षेत्रात आणि पुणे ते खानदेश मध्ये मुघाल वर अनेक हल्ले करून उत्तरेत दबाव निर्माण केला. बुरहाणपुरच्या मुघली सुभेदाराला बादशाहकडून बांगड्यांचा आहेर मिळाला, तो या दोन वीर पुरुषांनी गाजवलेल्या पराक्रमामुळे. मराठ्यांपेक्षा मुघलांचे सैन्य जास्त असूनही त्या सुभेदाराला पराभवाचे तोंड पहावे लागले होते.

जेव्हा राजाराम महाराज हे झुल्फिकार खानासोबत जिंजीच्या किल्ल्यावर मुरब्बी राजकारण करत होते, तेव्हा संताजी धनाजी या महान वीरांनी साऱ्या दख्खन मध्ये आपली तलवार गाजवत होते. दोड्डेरी म्हणजे संताजीच्या लढाईचा सर्वाधिक विरोत्तमाचा कळस.

मोगल इतिहासकार खाफी खानच्या मते संताजीं विरुद्ध लढाईचे फक्त ३ परिणाम असू शकतात – मरण पत्करणे, खंडणी देऊन वाट मागणे किंवा युद्धकैदी होणे. मराठ्यांनी औरंगजेबाची आणि मोगल सैन्याची हालत भयंकर खराब करून टाकली होती.

दोड्डेरीच्या लढाईत औरंगजेब याचा आयुष्यातील सर्वात मोठा पराभव होत कारण अनेक नामजाद सरदार एकट्या संताजीकडे पराभूत झाला हे बातमी औरंगजेब यास दरबारात सांगतील गेले तेव्हा औरंगजेब “जे काही घडले ते परमेश्वराच्या इच्छेने झाले सरदारांच्या हातची गोष्ट नव्हती, पण संताजी जिंकला” अशी माहिती आपल्याला मोगल दरबारातील कागदपत्रांमध्ये मिळते.

काफीखान व साकी मुसस्तादखाना या मोगल लेखकाने सदैव मराठ्यांनी विरोधात लेखन केले पण संताजीच्या पराक्रम बद्दल लिहितात संताजी सर्वात मोठी यशस्वी सेनानी होता. त्याने मोगलावर दहशत बसण्याइतके पराक्रम करून कित्येक मोगल सेनानी कैद केले.

त्यांच्या तलवारी मुळे मोगलांना मराठ्यांचा दरारा वाटु लागला. विस्तीर्ण भूप्रदेशावर प्रचंड फौजा नाचवून शत्रूस हटकून गोत्यात आणणारा संताजी घोरपडे एवढा कुशल सेनानी बहुदा मराठ्यांच्या इतिहासात क्वचितच आढळतो. अस रियासतकार सरदेसाई यांनी त्यांच्या बखरी मध्ये वर्णन केलं आहे.

संताजी घोरपडे यांनी १६८९ ते १६९८ पर्यंत संपूर्ण मोगल छावणीवर त्यांनी दहशत बसवली होती. छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाण झाल्या नंतर बरेच मराठा सरदार मृत्यू पडले किंवा फितूर झाले. राजाराम महाराजांना सुद्धा हजारो मैल लांब जिंजी वर १६८९ ते १६९७ पर्यंत अडकून राहावे लागले.

अश्यावेळी औरंगझेबाच्या पाच लाख सैन्याला तुटपुंजी सैन्यानं संताजी धनाजी ल नुसते थोपवून नाही धरले तर अनेक मोठ्या युद्धात मोगलांचे अनेक नामांकित सरदार मारले गेले.

संभाजी महाराज मृत्यू नंतर लगेचच संताजी विठोजी धनाजी ने शिखर शिंगणापूर जवळ थेट पाच लाख फौज असलेल्या औरंगझेब च छावणीवर हल्ला केला. ज्या तंबूत औरंगझेब झोपला होता ती जागा बदलली असल्यामुळे औरंगझेब च जीव वाचला. त्या तंबूच्या कळस कापून संताजी नी ती राजाराम महाराज ना दिली.

त्यानंतर कोल्हापूर जवळ शंभू राजांना पकडणाऱ्या मुकर्रब खाना आणि त्याच्या मुलाला हरवले त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा. त्यानंतर सर्जा खानाला संताजी धनाजी ने सातारा जवळ रामचंद्र अमात्य आणि शंकराजी या सर्वांनी मिळून घेरले.

मराठ्या कडे तुटपुंजी फौज होती, खजिना रिकामा होता, महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी औरंगझेब च मोठी फौज महाराष्ट्रात चाल धरून होती. या काळात स्वराज्य लष्करी नेतृत्व संताजी धनाजी कडे होते. राजाराम महाराजांचे वय आणि अनुभवी च्या अभावामुळे या दोघांना तामिळनाडू पर्यंत लक्ष द्यावे लागायचे.

संताजी धनाजी दोघे शुर असले तरी स्वभावात खुप फरक होता. संताजी शिस्तप्रिय होते. संताजी वागण्यात सौम्य नव्हते. पण धनाजी मात्र सौम्य होते. एखदी चूक झाली तर संताजी कडून माफी नसायची. संताजी धनाजी दोघे घनिष्ट मित्र होते इतके की धनाजी ने पहिल्या मुलाचे नाव संताजी ठेवले.

गनिमीकाव्यात तरबेज असे संताजी ह्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचे खरेखुरे शिष्य होते. त्यांच्या गनीमीकाव्यांनी आणि त्यातून होणाऱ्या नुकसानीमुळे मोगल सैन्य संताजींना जाम घाबरून होतं. कुठून येऊन संताजी नावाची संकट आपल्यावर कधी कोसळेल ह्याचा त्यांना नेम राहिला नव्हता.

Leave a Comment

You cannot copy content of this page