संधिवात, गठीया सांधेदुखी वेदना दूर होण्यासाठी जबरदस्त उपाय

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणपणातच सांध्यामध्ये असह्य वेदना देणारा संधिवात हा आजार अनेक जणांना झाल्याचे आपण बघत असतो. बराच वेळ एका जागेवर बसून काम करणाऱ्यांना, प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढलेल्यांना, आहारात कॅल्शियमची कमतरता असल्यास, कष्टाचे काम करणाऱ्यांना हा आजार होण्याचे प्रमाण अधिक आहे.

इंग्रजीमध्ये या आजाराला आर्थरायटिस असे म्हणतात ह्या आजारात आपल्या गुडग्याच्या हाडांची झीज झाल्याने तीव्र वेदना होतात. आज आपण संधीवाताच्या वेदना कमी होण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

ज्याचा अवलंब केल्याने तुम्हाला सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये भरपूर खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस असतात, जे सांधेदुखीवर खूप फायदेशीर असतात.

रोज सकाळी एक कप कोमट पाण्यात एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगर आणि मध मिसळून प्यायल्याने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. ऍपल सायडर व्हिनेगरचे पाण्यासोबत सेवन केल्याने शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकले जातात.

दालचिनीमध्ये असणाऱ्या अँटी-ऑक्सिडंट आणि वेदना कमी करणारे गुणधर्मामुळे संधिवाताचा त्रास कमी होण्यासाठी एक कप कोमट पाण्यात एक चमचा दालचिनी पावडर आणि एक चमचा मध मिसळून रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने वेदना कमी व्हायला मदत मिळते.

संधिवाताच्या वेदना दूर होण्यासाठी दररोज झोपण्यापूर्वी थोडेसे मोहरीचे तेल गरम करून त्याने आपल्या सांध्यांना मसाज केल्याने सांध्यातील रक्तप्रवाह जलद होऊन वेदना कमी होतात.

सांधेदुखीचा त्रास कमी होण्यासाठी दररोज एक ग्लास कोमट दुधात एक लहान चमचा हळद मिसळून प्यायल्याने आराम मिळतो. दुध प्यायल्याने हाडे मजबूत होतात; हळदीमुळे वेदना कमी होतात.

सकाळी झोपेतून उठल्यानंतर रिकाम्या पोटी लसणाच्या 1 – 2 पाकळ्या खाल्याने सांधेदुखीचा त्रास कमी व्हायला मदत होते. आपल्याला संधिवात, गठीया सांधेदुखी वेदना दूर होण्यासाठी जबरदस्त उपाय हि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर शेयर करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page