सांधेदुखी, टक्कल पडणे, जखम लवकर बरी होण्यासाठी ह्या गुणकारी झाडाच्या पानांचा वापर कसा करायचा?

आपल्या पूर्वजांना वेगवेगळ्या आजारांचा इलाज करता यायचा. त्यांना वेगवेगळ्या झाडांचे आयुर्वेदिक फायदे माहित होते परंतु आपल्या पिढीला झाडांपासून कोणकोणते फायदे होतात हेच माहित नसत; वेगवेगळ्या आजारांपासून आराम मिळण्यासाठी झाडाच्या अवयवांचा म्हणजेच पान, फुल, मूळ याचा वापर कसा करायचा हे माहित नसते.

म्हणूनच आम्ही आपल्यासाठी वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची माहिती घेऊन येत असतो. हि माहिती नियमित वाचायला मिळण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा. आज आपण धोतरा ह्या औषधी वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत.

धोतरा हि वनस्पती महादेवाला प्रिय असते. धोत्र्याला हिंदीमध्ये धतुरा असे म्हटले जाते. धोत्र्याच्या पानांमध्ये नैसर्गिक एन्टीऑक्सीडेन्ट घटक असतात. सांधेदुखीचा त्रास होत असल्यास 3-4 धोतऱ्याच्या पानांची पेस्ट तयार करून दुखत असलेल्या जागेवर पोटीस करून बांधावी. हा उपाय केल्याने सकाळपर्यंत आपल्याला फरक दिसून येईल.

केस गळत असल्यास धोत्र्याच्या पानांचा 1 चमचा रस तीळाच्या तेलात मिसळून केसांच्या मुळाशी लावा. 30 मिनिटे राहूद्या नंतर पाण्याने धुऊन टाका. हा उपाय नियमित केल्याने केस गळणे कमी होईल.

खरचटलेल्या जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी धोत्र्याच्या पानांचा रस कापसावर घेऊन तो कापूस जखमेला बांधा असे केल्याने जखम लवकर भरून येते.

आपल्याला सांधेदुखी, टक्कल पडणे, जखम लवकर बरी होण्यासाठी गुणकारी धोतरा झाडाची पाने हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page