7 दिवस सकाळी रिकाम्यापोटी मेथी दाणे भिजवलेले पाणी प्यायल्याने कोणकोणते फायदे मिळतात?

मेथी दाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. म्हणूनच त्यांचा वापर अनेक आजारांवर औषध म्हणून केला जातो. आज आपण सकाळी रिकाम्यापोटी मेथी दाणे भिजवलेले पाणी प्यायल्याने कोणकोणते फायदे मिळतात हे जाणून घेणार आहोत.

मेथीच्या दाण्यांमध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, फायबर, लोह मॅंगनीज, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, सोडियम, कार्बोहायड्रेट यासारखे अनेक पोषक घटक असतात.

मेथी दाणे भिजवलेले पाणी बनवणे अगदी सोपे आहे यासाठी रात्री एक ग्लास पाण्यात एक ते दीड चमचा मेथीचे दाणे भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी चांगले गाळून रिकाम्या पोटी प्या.

हवे असल्यास आपण नंतर मेथी दाणे ही खाऊ शकता. मेथी दाणे उष्ण गुणधर्म असणारे असल्याने जास्त प्रमाणात आणि सतत जास्त दिवस त्यांचे सेवन करु नका.

सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. आपले वजन कमी व्हायला मदत होईल तसेच शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होईल; मधुमेह नियंत्रणात येईल.

आपली पचनसंस्था मजबूत होईल, सांधेदुखीही कमी होईल, अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल, केस गळणे कमी होईल, चेहरा अधिक तजेलदार होईल.

आपल्याला सकाळी रिकाम्यापोटी मेथी दाणे भिजवलेले पाणी प्यायल्याने कोणकोणते फायदे मिळता हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page